वाढदिवस विशेष
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०१ ऑक्टोबर २०२५) -
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही विशेष गुण असतात. मात्र खऱ्या मित्राचे लक्षण म्हणजे मित्राच्या सुख-दुःखात, संकटात, कठीण प्रसंगी धावून जाणे. अशाच स्वभावगुणामुळे अनंता गोसाईजी गोखरे यांनी केवळ मित्र म्हणून नव्हे तर कुटुंबमित्र म्हणूनही विशेष स्थान निर्माण केले आहे. आमचा विदर्भचे संपादक दीपक शर्मा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या अनुभवातून अनंता गोखरे यांची दोस्ती, त्याग आणि कार्यकर्तृत्व अधोरेखित झाले आहे.
दोस्तीतील त्याग आणि आठवणी
वर्ष २०२० मध्ये अनंता गोखरे यांच्या वडिलांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी लॉकडाऊन सुरू असल्यामुळे चंद्रपूर व नागपूर येथे जाण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसरकूर व जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्याकडे परवानगी घेऊन उपचार केले गेले. दुर्दैवाने २०२१ मध्ये दुसऱ्या कोरोना लाटेत त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
वर्ष २०२२ मध्ये माझ्या (दीपक शर्मा) आईला ब्रेनस्ट्रोक झाल्यावर, क्षणार्धात अनंता गोखरे कार घेऊन धावले. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान ७ दिवस रात्रंदिवस ते सोबत राहिले. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात पुन्हा आईची प्रकुर्ती बिघडली तेव्हाही आणि नंतर ऑक्टोबर मध्ये बाबांच्या प्रकृती खालावल्यावरही अनंता दिवस-रात्र सोबतीला होते. माझ्या आई-बाबांच्या वारंवार बिघडत्या तबेतीची काळजी अनंता ला इतकी होती कि वेळप्रसंगी तात्काळ दवाखान्यात जात यावे याकरिता त्यांनी स्वतःची कार माझ्या दारात ठेवली. जवळपास ६ महिने ती कार आमच्या दारातच होती. हे आजही स्मरणात आहे.
सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य
अनंता गोखरे हे संत जगन्नाथबाबा यांचे भक्त असून कोरपना तालुक्यातील श्री वामनबाबा यांच्याशी जोडलेले आहेत. ते श्री पंचमुखी नंदीगड देवस्थानाचे अध्यक्ष असून मूळचे विरूर गाडेगाव येथील आहेत. आजही गावातील आध्यात्मिक व सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असतात.
धनगर समाजाचे बुलंद आवाज
धनगर समाजात सक्रिय कार्य करत, वर्ष २०१९ मध्ये बल्लारशाह–माणिकगड रेल्वे लाईनवर झालेल्या बकरी-शेळ्यांच्या मृत्यू प्रकरणात डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मदतीने न्याय मिळवून दिला. डिसेंबर २०२४ मध्ये विरूर स्टेशन येथील निलेश डवरे यांचा संशयास्पद मृत्यू घातपात असल्याचे स्पष्ट करून कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता आजही प्रयत्न करत आहे. धनगर समाजाचे मोर्चे असो, प्रश्न असोत किंवा वॉर्डातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अनंता गोखरे नेहमी सक्रिय असतात.
पत्रकारितेतील भक्कम प्रवास
आमचा विदर्भ न्यूज पोर्टल शी अनंता गोखरे घट्ट जुडलेले असून ते सध्या सहसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पत्रकारितेचा प्रवास २०१७ पासून सुरू झाला. प्रथम राजुरा शहर प्रतिनिधी, नंतर तालुका प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी आणि अखेरीस सहसंपादक या पदापर्यंत पोहोचत त्यांनी आपली मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटी सिद्ध केली आहे. पत्रकारितेतूनही त्यांनी अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडून समाजाच्या न्यायासाठी त्यांच्या संघर्ष सुरु आहे.
मानवाधिकार संघटनेत सक्रिय भूमिका
अनंता गोखरे हे मानवाधिकार संघटनेचे सक्रिय सदस्य असून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. आपल्या कामाचा गाजावाजा न करता, शांतपणे आणि नि:स्वार्थ भावनेने ते कार्य करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
अनंता गोखरे यांचे सामाजिक, आध्यात्मिक आणि दोस्तीतील योगदान असेच टिकून राहो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो व त्यांच्या कुटुंबाचा भरभराटीचा मार्ग खुला राहो, अशा वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा.......!
#AnantaGokhare #TrueFriendship #SocialLeader #SpiritualJourney #CommunityVoice #Vidarbha #ChandrapurNews #Rajura #AamchaVidarbha #FriendshipGoals #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.