आमचा विदर्भ - कृष्णा वाघुजी गेडाम
राजुरा (दि. ३० सप्टेंबर २०२५) -
तेलगू भाषिकांचा पारंपरिक बतुकम्मा देवी उत्सव राजुरा शहरातील मामा तलावाजवळ नगर पालिकेच्या शेजारील प्रांगणात सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे १८० किलो सात रंगाच्या फुलांनी सजवलेल्या बतुकम्मा देवीच्या सभोवती महिलांनी भक्तिगीतांच्या चालीवर सामूहिक नृत्य करून आपल्या आनंदाची अभिव्यक्ती केली. महिलांनी आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी देवीला साकडे घालून पूजा-अर्चा केली. या उत्सवाचे उद्घाटन समितीचे मार्गदर्शक स्वामी येरोलवार यांनी केले. यावेळी तेलगू भाषिकांसह मराठी भाषिक नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. विवाहित मुली व जावयांचा सत्कार करून त्यांना कपडे भेट देण्यात आले. रात्री ११ वाजता देवीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
या उत्सवात आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार अँड संजय धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, रमेश नळे, जेष्ठ भाजप नेते सतीश धोटे, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, ठाणेदार सुमित परतेकी, डाॅ. लहू कुळमेथे, डाॅ. अशोक जाधव, डाॅ. बांबोडे, डॉ. राजेश कतवारे, सिध्दार्थ पथाडे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संदीप जैन, अरुण मस्की, पत्रकार संघ अध्यक्ष अनिल बाळसराफ, पत्रकार प्रा.बि.यु. बोर्डेवार, डाॅ. उमाकांत धोटे, सुरेश रागीट यांच्यासह मोठ्या संख्येने राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्सवाच्या यशस्वितेकरिता बतुकम्मा देवी उत्सव समितीचे मार्गदर्शक स्वामी येरोलवार, क्रिष्णा कुमार, पवन चिंतल, सदया इरावेणी, श्रीनिवास भंडारी, रमेश पेड्डी, राकेश नामेवार, केशव त्रिवेदी, सुरज ताटपल्लीवर, क्रिष्णा गेडाम, राकेश शिगरी, भास्कर बोल्लू, प्रकाश चेन्नरवार, श्रीनिवास वलाला, ओबुलेसू गावीनी, शुभांगी गेडाम, अखिला येरोलवार, श्वेता येरोलवार, रूपा बोल्लु, विशाखा चिंतल, कृष्णावेणी त्रिवेदी, शारदा भंडारी, शारदा इरवेनी, शिल्पा नामेवार, दिव्या सिगारी, मानसी सिगारी, सरिता पेद्दी, अश्विनी ताटपल्लीवार, किरण कुमार, रमा चेन्नूरवार, महेश्वरी गावीनी, सुजाता वालाला यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
परंपरेचा वारसा
राजुरा शहरात जवळपास मागील ५ वर्षांपासून बतुकम्मा उत्सव तेलगू भाषिक समाज सामूहिकरीत्या आयोजित करत आहे. या उत्सवात इतर समाजातील लोकांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. त्यामुळे बतुकम्मा उत्सव हा अनेकतेत एकतेचा संदेश देतो. महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे.
#BatukammaFestival #RajuraCelebration #TeluguCulture #UnityInDiversity #FloralFestival #Batukamma2025 #WomenEmpowerment #RajuraEvents #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.