आमचा विदर्भ - दीपक शर्मा
मुल (दि. ३० सप्टेंबर २०२५) -
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांच्या पुढाकारात आयोजित ‘भाऊंचा गरबा महोत्सवा’ला यावर्षी खास आकर्षण मिळणार आहे. या महोत्सवात प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती मुल यांच्या वतीने दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान तालुका क्रीडा संकुल, मुल येथे हा महोत्सव होत आहे. या कालावधीत दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होत असून, भव्य समूह गरबा दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
दि. १ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत (Navratri Festival) नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता त्या मुल तालुक्यातील बेंबाळ गावातील देवी जागरण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री ८.३० ते १० वाजेपर्यंत त्या तालुका क्रीडा संकुल, मुल येथे होणाऱ्या भाऊंच्या गरबा महोत्सवात नागरिकांशी भेट घेणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात आकर्षक रोषणाई, रंगीबेरंगी सजावट व पारंपरिक गरबा-दांडियाच्या तालावर तरुणाई थिरकणार आहे. परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह असून, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
#BhausGarbaFestival #MulCelebration #PrajaktaMali #Navratri2025 #GarbaNights #SudhirMungantiwar #MulEvents #VidarbhaCulture #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.