आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २९ सप्टेंबर २०२५) -
राज्यातील शेतकरी संकटात असताना शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, यासाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले. त्यांनी सांगितले की, “शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून एनडीआरएफ निकष बाजूला ठेवून सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत तात्काळ द्यावी. तसेच निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून ७/१२ कोरे करावे.”
हे धरणे आंदोलन दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाले. या आंदोलनात एकूण ११ मागण्या मांडण्यात आल्या. निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री आणि महसूलमंत्री यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले.
आंदोलनात माजी आमदार ॲड. वामनराव चटप, निळकंठ कोरांगे, सुनिल बावणे, मदन सातपूते, प्राचार्य सुरेश मोहितकर, शालिक माऊलीकर, रमाकांत मालेकर, रमेश नळे, पांडुरंग वासेकर, मारोती बोथले, मंगेश मोरे, विठ्ठल पाल, बाबा रोहणे, बळीराम खुजे, दत्तु ढोके, सुधीर सातपूते, किशोर दहेकर, जीवन आमने, बबन दानव, सुरेश आस्वले, पुरूषोत्तम अंगलवार, विशाल जीवतोडे, विलास पायपरे, भास्कर मत्ते, भाऊराव बोबडे यांच्यासह शेतकरी संघटना, शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या :
- ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५० हजार मदत द्यावी.
- सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून ७/१२ कोरे करावे.
- सिसिआयला कापूस विक्री नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी.
- कर्जासाठी बँकांनी लादलेली सिबिल स्कोअरची अट रद्द करावी.
- कापूस व डाळीवरील आयात शुल्क पुन्हा लागू करावे.
- गैरआदिवासींना पट्ट्यांसाठी तीन पिढ्यांची अट रद्द करावी.
- वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान थांबवावे किंवा तातडीने भरपाई द्यावी.
- सर्पदंश मृत्यूग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी.
- स्मार्ट मीटर सक्तीने लावू नयेत.
ॲड. वामनराव चटप यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, “केंद्र सरकारच्या धोरणांमुळे बाजारात सोयाबीन, तूर, चना, कापूस, मूग यांचे भाव कोसळले आहेत. आयात शुल्क रद्द करून विदेशातून स्वस्तात आयात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची किंमत घसरली आहे. शेतकऱ्यांवर आस्मानी व सुलतानी संकट एकाचवेळी कोसळले आहे.”
#ChandrapurFarmers #FarmerProtest #AgricultureCrisis #FarmersRights #LoanWaiver #CompensationNow #StopImportPolicy #CropDamageRelief #WamanraoChatap #advwamanraochatap #VidarbhaFarmers #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.