आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ ओक्टोबर २०२५) –
राजुरा नगरपरिषदेची निवडणूक मोठ्या कालावधीनंतर पुन्हा होण्याच्या तयारीत असून, या वेळेस सर्वसाधारण (ओपन) गटातील उमेदवारांना थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरता येणार आहे. त्यामुळे विविध पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली असून, भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते विनायक शंकरराव देशमुख यांनीही या निवडणुकीत सक्रिय सहभागासाठी तयारी सुरू केली आहे.
राजकीय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
विनायक शंकरराव देशमुख हे माजी विधान परिषद सदस्य, स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि राजुरा नगरपरिषद जवळपास २४ वर्षे नगराध्यक्ष राहिलेले अँड. शंकरराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. विनायकराव देशमुख यांचा जन्म १ जानेवारी १९६० रोजी झाला असून ते राजुराचे मूळ रहिवासी आहेत. ते ब्राह्मण समाजातील असून सर्वधर्म समभावाचे गुण त्यांच्या नसानसात आहे, त्यांचे शैक्षणिक शिक्षण B.A. (नागपूर विद्यापीठ) तसेच ITI चंद्रपूर येथून झाले आहे.
सामाजिक आणि संघटनात्मक कार्य
- स्व. पद्मश्री बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत जोडो अभियानात सक्रिय सहभाग.
- वयाच्या १०व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले.
- स्व. जयरामराव देशमुख न्यास, राजुरा चे अध्यक्ष म्हणून कार्यरत.
- या न्यासाद्वारे राजुरातील १४ गरजू लाभार्थी कुटुंबांना विनामूल्य स्वच्छता गृह बांधून दिली.
- या उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
- या उपक्रमाची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानातून मिळाली.
पत्रकारिता व जनसेवा
- १९ नोव्हेंबर १९८७ रोजी स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी “राजुरा एक्सप्रेस” हे साप्ताहिक सुरु केले, जे आजही आदिवासी आणि ग्रामीण भागातील समस्यांना आवाज देते.
- राजुरा तालुका पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्य केले.
- चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संघटन सचिव पद भूषविले.
- पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सन १९९५ मध्ये बालशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित.
राजकीय जबाबदाऱ्या आणि पदे
- भाजप जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) म्हणून सक्रिय कार्यरत.
- कृषी उत्पन्न बाजार समिती, राजुरा – संचालक.
- राजुरा नगरपालिका – नगरसेवक.
- राज्य परिवहन मंडळ दक्षता समिती – सदस्य.
- राजुरा सेवा सहकारी सोसायटी – संचालक म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात मोलाची भूमिका.
- संजय गांधी निराधार योजना समिती – अध्यक्ष म्हणून गरीब, वंचित आणि निराधारांना न्याय मिळवून दिला.
- २०१४ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रतिनिधी म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आणि पक्षाला यश मिळवून दिले.
संघर्ष आणि जनआंदोलन
सन १९८५ मध्ये उद्योगाकरिता बँक कर्ज नाकारल्याने, तत्कालीन स्टेट बँक ऑफ हैदराबाद (आताची स्टेट बँक ऑफ इंडिया) राजुरा समोर आमरण उपोषण करून स्थानिक समस्यांवर जनतेचा आवाज बुलंद केला.
वारसा पुढे नेणारे कार्य
त्यांचे वडील अँड. शंकरराव देशमुख यांनी राजुरा नगराध्यक्ष म्हणून तब्बल २४ वर्षे काम केले. त्यांच्या कार्यकाळात सुंदर, आधुनिक आणि स्वच्छ राजुरा ही संकल्पना रुजवण्यात आली होती. आज विनायक देशमुख त्या परंपरेचा वारसा पुढे नेऊन लोकसेवेला वाहून घेत आहेत.
व्यवसाय आणि व्यक्तिगत माहिती
- व्यवसाय: किसान सेवा केंद्र (इंडियन ऑईल डीलर – पेट्रोल पंप)
- भाषा ज्ञान: मराठी, हिंदी, इंग्रजी
आगामी निवडणुकीसाठी सज्ज
राजुरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वसाधारण गट उघड झाल्यामुळे, विनायक देशमुख यांना नगराध्यक्षपदासाठी मजबूत दावेदार मानले जात आहे. भाजपच्या संघटनात्मक बळावर आणि दीर्घ सामाजिक संपर्काच्या जोरावर ते आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांना भाजपाद्वारे तिकीट मिळेल कि नाही हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.
#VinayakDeshmukh #RajuraElections #BJPChandrapur #RajuraLeader #CleanIndiaMission #RajuraExpress #PublicService #SocialLeader #RajuraPolitics #ChandrapurNews #VidarbhaPolitics #InspiringJourney #RajuraDevelopment #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.