आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०८ ऑक्टोबर २०२५) -
शहरात नुकत्याच मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीकडून तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ (Mephedrone Drug) जप्त झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे चंद्रपूरमध्ये अमली पदार्थांची विक्री आणि सेवनाचे प्रमाण गंभीर पातळीवर वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या अमली साखळीला आळा घालण्यासाठी भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर जिल्हा तर्फे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
- संशयित ठिकाणी पोलिसांचे विशेष छापे व सतत गस्त वाढवावी.
- शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी.
- पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करावी.
- गुन्हेगारांवर कठोर शिक्षा आणि द्रुतगती न्यायप्रक्रिया राबवावी.
- युवकांना क्रीडा, संस्कारवर्धन व व्यसनमुक्ती उपक्रमांकडे वळविण्याची मोहीम सुरू करावी.
निवेदन देते वेळी शिष्टमंडळात भारतीय जनता पक्ष जिल्हा चंद्रपूर महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, विशाल निंबाळकर, मनोज सिंघवी, यश बांगडे, गणेश रामगुंडेवार, उमेश आष्टणकर, अमित निरंजने, मनिष खापरे, विकास गोठे, देवा बुरडकर, आशिष गिरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिष्टमंडळाने पोलिस प्रशासनाला आवाहन केले की, चंद्रपूरमधील युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समाजातून अमली पदार्थांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी तात्काळ व प्रभावी कारवाई करावी. या वेळी बोलताना डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, “अमली पदार्थ रोखा – चंद्रपूर वाचवा!” हे फक्त घोषवाक्य नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
#ChandrapurNews #StopDrugsSaveYouth #BJPChandrapur #DrugFreeChandrapur #SayNoToDrugs #MephedroneSeizure #YouthAwareness #AntiNarcoticsDrive #ChandrapurPolice #SudhirMungantiwar #DrMangeshGulwade #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.