Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी चंद्रपूरमध्ये ठिय्या आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आंदोलनस्थळी आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. १४ सप्टेंबर २०२५) -         भारतीय मजदूर संघ सलग्न भारतीय ...
आंदोलनस्थळी आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. १४ सप्टेंबर २०२५) -
        भारतीय मजदूर संघ सलग्न भारतीय मोटार वाहन संघ चंद्रपूर विभाग यांच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले. कामगारांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

        आंदोलनाची माहिती मिळताच माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मागण्यांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या उपस्थितीने आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला.

        आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवला. या वेळी जिल्हा मंत्री पवन ढवळे, विभागीय अध्यक्ष वसंत शिकारे, विभागीय सचिव राजेंद्र कायरकर, सल्लागार शामराव तामटकर, निखारे, सहस्त्रबुधे, तसेच श्रीमती वंदना मडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला.

#chandrapurprotest #WorkersRights #bmsunion #motorvehicleunion #SudhirMungantiwar #pawandhavle #LabourMovement #chandrapurnews #WorkersUnity #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top