आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १५ सप्टेंबर २०२५) -
दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी शिवसेना (शिंदे गट) युवा सेना लोकसभा संघटक पदी नंदू गट्टूवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरून देण्यात आली. नियुक्तीचे पत्र पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले यांच्या हस्ते देण्यात आले.
नंदू गट्टूवार यांना संघटना बांधणीचा व्यापक अनुभव आहे. ते आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भातील प्रमुख नेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू राष्ट्राची भावना असलेल्या तरुणांची मोठी गर्दी आहे. या संघटनात्मक कौशल्यामुळे पक्षाने त्यांना चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी युवा सेना संघटक म्हणून नियुक्त केले आहे. नव्या जबाबदारीत नंदू गट्टूवार हे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये युवा सेना संघटना मजबूत करण्याचे कार्य करणार असून तरुणांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचे काम करतील. पक्ष व नेतृत्वाकडून नंदू गट्टूवार यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
#ShivSena #ShindeGroup #YouthWing #ChandrapurPolitics #NanduGattuwar #EknathShinde #ShrikantShinde #PoliticalLeadership #YouthLeadership #PartyOrganisation #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.