आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १५ सप्टेंबर २०२५) -
भजन हे केवळ भक्तिगीत नसून ते समाजात श्रद्धा, अध्यात्म आणि एकात्मतेचे प्रेरणादायी माध्यम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर तालुक्यातील तुकुम येथील अय्यप्पा मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात चंद्रपूर ग्रामीणमधील 30 भजन मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा” हे भजन गाऊन केली. त्यांच्या हस्ते ग्रामीण भागातील 30 भजन मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते रामपाल सिंग, श्रीनिवास जंगमवार, नामदेव आसुटकर, मनोज मानकर, शांताराम चौखे, फारुख शेख, गौतम निमगडे, चंद्रकांत धोडरे, देवानंद थोरात, रूद्रनारायण तिवारी, नागेश कडूकर, अनिताताई भोयर, रोशनी खान, केमाताई रायपुरे, वनिता आसुटकर, गीताताई वैद्य, गीता सिंग, अरविंद बोरकर, अमोल जगताप, अतूल पिल्लरवार, मुक्ता येरगुडे, सुरेखाताई थोरात, मोनी आसवानी, रंजनाताई किन्नाके, दयानंद बंकुवाले, शंकर खत्री, घनश्याम यादव यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “भजनामुळे धार्मिक वातावरण भारावून जाते. भजन प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी ऊर्जा आहे. या भक्तिभावाची जोपासना करण्यासाठी साहित्याचे वाटप केले असून, यातून समाजात श्रद्धा व एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल.” ते पुढे म्हणाले की, मतदारसंघात विकासात्मक कामांसोबतच सांस्कृतिक कार्यालाही प्राधान्य दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, भजन मंडळांसाठी 15 कोटींचा निधी, अयोध्या राम मंदिरासाठी काष्ठ पाठविण्याचा मान, संसद भवनासाठी बल्लारपूरच्या लाकडाचा वापर, भीमाशंकर ज्येष्ठ नागरिक सोयीसुविधा, कोराडी येथे आई जगदंबा मंदिर बांधकाम यासह विविध कार्यांची माहिती त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे भारतात आणणे, नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा अभिमान व्यक्त केला.
#BhajanSeva #SudhirMungantiwar #Chandrapur #SpiritualUnity #CulturalHeritage #FaithAndDevotion #BhaktiMovement #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.