सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला उपक्रम
शिवसैनिकांच्या उपस्थितीत साजरा झाला वाढदिवस सोहळा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
भद्रावती / चंद्रपूर (दि. १४ सप्टेंबर २०२५) -
(Dr. Nilamtai Gorhe Birthday) शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना फळवाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर सौ. मिनलताई आत्राम व शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी केले.
उर्जानगर कोंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तर देवाळा येथील "डेबू सावली" वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळवाटप करून त्यांना आनंद देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व वृद्धांनी डॉ. निलमताई गोऱ्हे यांना दीर्घायुष्य लाभो व उत्तम आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये बल्लारपूर विधानसभा महिला संघटिका सौ. कृष्णाताई सुरमवार, शिवसेना उपतालुका प्रमुख विक्की महाजन, भद्रावती युवासेना उपशहर प्रमुख विवेक दुर्गे, शिवसैनिक योगेश मुऱ्हेकर, भद्रावतीचे माजी नगरसेवक नाना दुर्गे आदींची उपस्थिती होती. गावकऱ्यांनी व उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले.
#NilmataiGorhe #ShivSena #SocialService #EducationForAll #GrandparentsCare #ChandrapurNews #GivingBack #MinaltaiAtram #SantoshParkhi #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.