रोटरी क्लबच्या जेवण वाटपाने पोलिस भावूक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०९ सप्टेंबर २०२५) -
अनंत चतुर्दशी निमित्त राजुरा शहरात गणेश विसर्जनाचा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी रोटरी क्लब राजुरा तर्फे विशेष उपक्रम राबविण्यात आला.
राजुरा शहरात विसर्जन मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी बाहेरील तालुक्यातून आलेल्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांची खाण्या-पिण्याची सोय नीट होत नाही, हे लक्षात घेऊन रोटरी क्लब राजुरा तर्फे दरवर्षी जेवण पॉकेट व पाण्याच्या बॉटलींचे वाटप केले जाते. यावर्षीही अध्यक्ष निखिल चांडक, सचिव राजू गोखरे, माजी अध्यक्ष कमल बजाज, नवल झवर, सारंग गिरसावळे, उपाध्यक्ष अमजदभाई खान, कोषाध्यक्ष अभिषेक गंपावार व संपूर्ण रोटरी सदस्यांनी मिळून १०० जेवण पॉकेट वाटप करण्याचा निर्णय घेतला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस विभागाची रीतसर परवानगी घेण्यात आली. कार्यक्रमादरम्यान अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी “आमच्या खाण्यापिण्याची काळजी कोणीच घेत नाही, पण आज तुम्ही आम्हाला जेवण दिलेत ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे” असे सांगून रोटरी क्लब सदस्यांचे आभार मानले. पोलिसांचे हे आशीर्वाद रोटरी सदस्यांनी प्रसाद म्हणून स्वीकारले. या उपक्रमाला राजुराचे ठाणेदार व नगरपरिषद राजुराचे मुख्याधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.
या उपक्रमासाठी केडी फूड जंक्शनचे व्यवस्थापक बबलू बघेल यांनी संपूर्ण जेवण पॅकिंग, रोटरी लोगो लेबलिंगची जबाबदारी घेतली आणि उत्कृष्ट दर्जाचे जेवण वाजवी दरात पुरविले. त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. रोटरी क्लब राजुरा तर्फे यापुढेही अशा सामाजिक उपक्रमांचा सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
#GanpatiVisarjan #PoliceSupport #RotaryClubRajura #CommunityService #RespectForPolice #AnantChaturdashi #SocialInitiative #NikhilChandak #RajuGokhare #KamalBajaj #NavalJawar #SarangGirsawale #AmjadKhan #AbhishekGampawar #maharashtrapolice #chandrapurpolic #rajurapolice #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.