Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कुपोषण मुक्त चळवळीतील कार्याबद्दल अमित महाजनवार सन्मानित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हंसराज अहिर यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव सुदर्शन निमकर वाढदिवसानिमित्त समाजसेवकांचा सन्मान आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजूरा (दि. ०८ सप्टें...
हंसराज अहिर यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव
सुदर्शन निमकर वाढदिवसानिमित्त समाजसेवकांचा सन्मान
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजूरा (दि. ०८ सप्टेंबर २०२५) -
        माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुदर्शन निमकर मित्र परिवाराच्या वतीने (५ सप्टेंबर) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

        कुपोषण मुक्त चळवळीतील उत्कृष्ट कार्याबद्दल बाळू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सिंदेवाही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमित महाजनवार, रा. राजूरा यांना कुपोषण मुक्त चळवळीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

        या सोहळ्याला माजी आमदार अँड. संजय धोटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

#RajuraNews #AwardCeremony #CommunityHeroes #SocialWork #NutritionFreeMission #HonourAndRespect #LeadershipInAction #hansrajahir #sudarshannimkar #advsanjaydhote #ravindrashinde #vijaybavane #DistrictCentralCooperativeBank #ExMLA #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top