आमचा विदर्भ - निशा महेश मोहुर्ले
राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२५) -
येथील आरोही सुगम संगीत विद्यालय आणि स्वर प्रीती कला अकादमीच्या विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवानिमित्त आकाशवाणीवर धार्मिक गीतं सादर करण्याची संधी मिळाली आहे. दिनांक १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात भक्तिगीत, अभंग आणि नवरात्राशी संबंधित गाणी सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी चंद्रपूरच्या ज्येष्ठ निवेदिका हेमा बहादे यांनी आरोही सुगम संगीत विद्यालय आणि स्वर प्रीती कला अकादमी ला सदैव प्रोत्साहन देत संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्रप्रमुख, मार्गदर्शिका व संयोजिका अलका दिलीप सदावर्ते यांनी महिलांना संगीताचे धडे देऊन त्यांना गायन क्षेत्रात मार्गदर्शन केले. तर स्वर प्रीतीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते यांनी आयोजन व संयोजनाची जबाबदारी सांभाळून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली.
या कार्यक्रमात सुगम संगीत विशारद विद्यार्थी करुणा गावंडे, लता कुळमेथे, जयश्री मंगरूळकर यांनी तर उपांत्य विशारद विद्यार्थी प्रीती कस्तुरे आणि अभिषेक वाटेकर यांनी वैयक्तिक गीते सादर केली. तसेच केंद्रप्रमुख अलका सदावर्ते यांनी कवी नारायण वामन टिळक यांचे दोन अभंग सादर केले. महिषासुर मर्दिनी स्तोत्राचे सामूहिक सादरीकरण गृहिणी व कुमारी विद्यार्थिनींनी एकत्रितपणे केले. यात सहगायन करणाऱ्या विद्यार्थिनी विना देशकर, सुनिता कुंभारे, प्रतिभा भावे, संध्या बाळसराफ, ज्योती कोरडे, स्नेहा वाटेकर, प्रिया खंडाळे, निर्मला बांगडे, आशा वाटेकर, अंशिका पुराणिक, मिताली पिदुरकर, पायल ताजणे यांचा सहभाग होता.
वाद्यसाथीमध्ये पेटीवर कुमारी आरुषी डवरे, तर डफ आणि झांज यावर अलका सदावर्ते यांनी साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सदावर्ते, स्वतंत्र कुमार शुक्ला, धनंजय डवरे, अंजया कणकम यांनी मोलाचे योगदान दिले. गेल्या चार वर्षांपासून आरोही सुगम संगीत विद्यालय व स्वर प्रीती कला अकादमी राजुरा आणि परिसरातील सांस्कृतिक क्षेत्रात नावारूपाला आली आहे. या विद्यालयाला भारतीय संगीत कला पीठाचे परीक्षा केंद्र मिळाल्याने गेल्या चार वर्षांत २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या आहेत.
केंद्रप्रमुख अलका दिलीप सदावर्ते या गायन, पेटीवादन व वादनाचे धडे देतात. वय वर्षे ५ ते ६५ पर्यंतचे महिला-पुरुष, लहान मुले व मुली येथे संगीत शिक्षण घेत आहेत. यावर्षी प्रथमच राजूरात सुगम संगीत विशारद परीक्षेला पाच विद्यार्थी बसणार असून, ही ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे. स्थानिक रसिकांच्या प्रोत्साहनामुळे हे विद्यालय आणखी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
#RajuraNews #ChandrapurCulture #NavratriSpecial #IndianClassicalMusic #MusicFestival #AarohiMusicSchool #SwarPreetiAcademy #AllIndiaRadio #BhaktiGeet #NavratriCelebration #swarpritiakadami #aarohisugamsangeetvidyalay #alkasadavarte #dilipsadavarte #swatantrakumarshukla #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.