Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: "काँग्रेसने केले विकासकाम, भाजप घेतेय खोटे श्रेय" – माजी आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अपघातग्रस्त कुटुंबांना श्रेयासाठी वेठीस धरणे अमानुष – काँग्रेसची टीका वोट चोरी, बोगस मतदार भाजपचा बनवेगिरीचा खेळावर काँग्रेसचे ताशेरे आमचा व...
अपघातग्रस्त कुटुंबांना श्रेयासाठी वेठीस धरणे अमानुष – काँग्रेसची टीका
वोट चोरी, बोगस मतदार भाजपचा बनवेगिरीचा खेळावर काँग्रेसचे ताशेरे
आमचा विदर्भ - 
राजुरा (दि. २८ सप्टेंबर २०२५) –
        अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना भरपाई जाहीर झाली असताना, चंद्रपूर जिल्ह्याला वगळणे ही शेतकरीविरोधी धोरणांची चरमसीमा आहे. आधीच शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना शासनाने सरसकट सर्वेक्षण न करता निकष लावून सर्वे सुरू केला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. काँग्रेसने स्पष्टपणे मागणी केली आहे की, "निकष नकोत – सरसकट भरपाई हवी!"

        खतांच्या कृत्रिम टंचाईचा डोंब उभारून सत्ता टिकवणाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. उपलब्ध खतांचा पुरवठा केवळ काही तालुक्यांनाच देऊन इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात ५ आमदार असूनही शेतकरी वाऱ्यावर, हे संतापजनक वास्तव! असे सुभाष धोटे म्हणाले. काँग्रेसने इशारा दिला आहे की शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. अशी भूमिका चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा येथे पत्रकार परिषदेत घेतली. त्यांच्या सोबत काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, जय भवानी कामगार सेनेचे सुरज ठाकरे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुळमेथे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, भुषण बानकर, धनराज चिंचोलकर, महादेव ब्राह्मणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वोट चोरी – भाजपा मौन का?
        धोटे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. त्यांनी उघड केले की राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल ६८६१ मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. एकट्या राजुरा शहरात ३१९५, गडचांदूरमध्ये ११२२, कोरपण्यात ६६२, लखमापुरात ४०७, जिवतीत १३५, नांदात ३८३, बाखर्डीत ७९ अशी बोगस नावे समाविष्ट केली गेली. हा मतदारांचा सरळ अपमान असून यामागे कोण मास्टरमाइंड आहे, हे ११ महिन्यांनंतरही अस्पष्ट, मात्र यावर भाजप का गप्प? हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्याहूनही विचित्र म्हणजे भाजपचे नेते म्हणतात, "वोट चोरी झालीच नाही" आणि दुसरीकडे आम्हीच एफआयआर करायला लावली! हे उघड बनवेगिरीचे उदाहरण असल्याचे धोटे यांनी सांगितले.

६१ लाख रोकड – तरीही कारवाई शून्य!
        २०२४ विधानसभा निवडणुकीदरम्यान ६१ लाख रुपयांची रोकड व प्रचार साहित्य पकडले गेले, परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही. धोटे यांनी विचारले "हे कायदाशून्य राज्य आहे का?"

घरकुल व जागेवर नवा घोटाळा
       राजुरा शहरातील आयएचएसडीपी, सोनियानगर, इंदिरानगर योजनेखाली २०११ पासूनच घरकुलांचे हक्कपत्र वितरित झाले आहेत. तरीही भाजपकडून पुन्हा नागरिकांचे अर्ज, आधार कार्ड व प्रतिज्ञापत्र गोळा करत आहेत. "घरकुल हक्कांवर राजकारण व नागरिकांची दिशाभूल – भाजपच्या डावपेचाचा भाग," असा आरोप करण्यात आला.

शहर विद्रूप करणारे बॅनर व निष्क्रिय प्रशासन
        राजुरा व गडचांदूर शहरात परवानगीशिवाय बॅनर, पोस्टर, होर्डिंग लावून विद्रूपीकरण झाले आहे. २३ सप्टेंबरला तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई नाही. काँग्रेसने स्पष्ट चेतावणी दिली "न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन चालूच राहिल्यास प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करू!"

डीजे प्रकरण – गणेश मंडळांवर अन्याय
        अनंत चतुर्दशीला सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे डीजे सुरू करण्यात आला. यात सत्ताधारी स्वतः नाचले, पण गुन्हे दाखल झाले ते फक्त ७ गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांवर! काँग्रेसने याला "सर्वात मोठा ढोंग व भक्तांचा अपमान" म्हटले.

अपघातातील पीडितांवरही श्रेयवाद!
        २८ ऑगस्टच्या कापणगाव अपघातात ६ जण मृत्यूमुखी पडले. तहसीलदार, पोलिस व सर्वपक्षीय बैठकीत कंपनीने प्रत्येकी ४ लाखांची मदत देण्याचे ठरवले. पण सत्ताधाऱ्यांनी "हे आम्हीच मिळवून दिले" असे सांगत मृतक कुटुंबीयांना राजकीय पक्षाच्या कार्यालयात दिवसभर वेठीस धरून धनादेश दिला. यामुळे कुटुंबीय व कार्यकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

काँग्रेसचे खरे विकासकाम – भाजपचा खोटा श्रेयवाद
        सुभाष धोटे यांनी स्पष्ट केले की उपजिल्हा रुग्णालय, प्रशासकीय इमारत, तलाव सौंदर्यीकरण, वनउद्यान, पशुसंवर्धन, गोंडपिपरी वळणमार्ग, ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर नगरपालिका, रस्ते, सभागृह, वाचनालये, आरोग्य केंद्रे ही सर्व कामे काँग्रेस काळात मंजूर झाली. पण सत्ताधारी त्याच कामांचे भूमिपूजन करून खोटे श्रेय घेत आहेत.

जिवती व गोंडपिपरी प्रश्न
        जिवती तालुक्यातील ८६४५.८०९ हेक्टर वन जमिनीचा प्रश्नांबाबत काँग्रेस ने वारंवार पाठपुरावा केला. याबाबत तत्कालीन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे दालनात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत दि. २३/०२/२०२२ रोजी बैठक घेऊन वसंत बोमेवार यांनी दाखल केलेली रिट याचिका क्रमांक ३६६९/२००९ चे अनुषंगाने धोंडा अर्जुनी, धोंडा मांडवा, टेकाअर्जुनी, टेकामांडवा, हिमायतनगर, पालडोह, चिखली खुर्द, पाटागुडा, राहपल्ली बु., राहपल्ली खु., माराईपाटण या ११ गावाचे वनखंडात समाविष्ट नसलेले ५६५९.८५४ हेक्टर क्षेत्र व निर्वणिकरण झालेले २९८९.९५५  हेक्टर क्षेत्र असे एकुण ८६४९.८०९ हेक्टर क्षेत्र विवादीत क्षेत्रातून वगळणे बाबतचा जिल्हाधिकारी, चंद्रपूर व उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर याची संयुक्त स्वाक्षरी असलेला अहवाल दिनांक ४/०५/२०२३ व त्यापूर्वीही शासनास सादर झालेला होता आणि त्यानुसारच पुढील कार्यवाही करणे राज्यशासन भाग पडले. जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमाकंन होत नव्हते याबाबत वारवार पाठपुरावा करून परमडोली, तांडा, कोटा बुज, कोटा खु, लेंडीगुडा, मुकदमगुडा, लेंडीजाळा, महाराज गुडा, अंतापूर, इंदिरा नगर, शंकर लोदि, पद्मावती, परसगुडा, भोलापठार, या १४ गावातील नागरिकांना न्याय मिळवून दिला. गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय जीर्ण झाल्याने काँग्रेसने पाठपुरावा करून निधी मंजूर करवला.

वीज, आरोग्य, महिला योजनांत फसवणूक
        सेवा पंधरवड्यात देवाडा PHC येथे पक्षाचे बॅनर लावून प्रचारबाजी केली. राजुरा व तालुक्यात विजेचा लपंडाव सुरूच आहे. महिलांचे आधार कार्ड गोळा करून "लाडक्या बहीण योजना"च्या नावाखाली कूपन वाटप सुरू आहे. काँग्रेसने याला "जनतेची फसवणूक" म्हटले.

#FarmersJustice #CongressVoice #BJPExposed #VoteScam #RajuraPolitics #StopFakeCredit #PeopleFirst #pressconfarance #patrakarparishad #subhashdhote #arundhote #ranjanlande #vikasdevalkar #SurajThackeray #prabhakaryerane #harjitsinghsandhu #gajananbhatarkar #AdvChandrashekharChandekar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top