Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोखंडी चॅनल चोरी प्रकरणात चार आरोपी जेरबंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
₹16.86 लाखांचा मुद्देमाल हस्तगत – ट्रकसह 17 नग चॅनल जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -         पोलीस स्टेशन पडो...
₹16.86 लाखांचा मुद्देमाल हस्तगत – ट्रकसह 17 नग चॅनल जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
        पोलीस स्टेशन पडोली येथे दाखल झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत चार आरोपींना जेरबंद करून तब्बल 17 नग लोखंडी चॅनल आणि एक ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ₹16,86,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी अभिलेख परमेश्वर वय 41 वर्ष, धंदा खाजगी नोकरी, रा. घुगूस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एमआयडीसी परिसर ताडाळी येथे सुरू असलेल्या रोड बांधकामासाठी 6 मीटर लांबीचे 58 नग लोखंडी चॅनल ठेवण्यात आले होते. दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता तपासणी केली असता त्यातील 17 नग, किंमत अंदाजे ₹1,86,000/-, चोरीला गेल्याचे आढळले. यावरून पोलीस स्टेशन पडोली येथे पोस्टे अप क्र. 146/2025, कलम 303(2) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

        पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांनी गुन्हे शोध पथकाला शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले. यानुसार डीबी इंचार्ज विनोद वानकर, प्रतिक हेमके, धिरज भोयर, कोमल मोहजे, सुचिता उमरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी ताडाळी परिसरात संशयित इसमांना पकडले. चौकशीत त्यांनी कबुली दिली की त्यांनीच लोखंडी चॅनल चोरी केली असून वाहतूक करण्यासाठी ट्रक वापरला.

अटक आरोपींची नावे
  • भारत देवी निषाद वय 25 वर्ष, रा. लखमापूर
  • दगदिशकुमार उर्फ गुड्डु ग्यानप्रकाश निषाद वय 27 वर्ष रा. लखमापूर
  • सुनिल राकेश निषाद वय 19 वर्ष रा. लखमापूर
  • सुनिल अवधेश निषाद वय 18 वर्षरा. लखमापूर
        त्यांच्याकडून 17 नग लोखंडी चॅनल ₹1,86,000/- किंमतीचे तसेच महिंद्रा कंपनीचा ब्लाजो 14 चाकी ट्रक क्र. एमएच-34-बीजी-9323, किंमत ₹15,00,000/- असा एकूण ₹16,86,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांच्या नेतृत्वात गुन्हे अन्वेषण विभागाने केली.

#ChandrapurPolice #CrimeNews #ChandrapurUpdates #MIDCTheftCase #PoliceAction #ChandrapurCrime #JusticeServed  #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top