शिक्षण, आरोग्य व जनतेच्या मूलभूत सुविधा यावर विश्वास ठेवणाऱ्या AAP ची महाराष्ट्रात मजबूत घोडदौड
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 09 सप्टेंबर 2025) -
आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस आम आदमी पक्षाचे दिल्ली येथील आमदार प्रकाश जरावर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजित काटले, संघटक भूषण ठाकारकर, प्रदेश सहसचिव सुनील मुसळे तसेच जिल्हा आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या बैठकीला आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, मुल तालुका अध्यक्ष कवडू येनप्रेडीवार, शेतकरी प्रभाग अध्यक्ष दिपकराव बेरशेट्टीवार, सुनील भोयर तसेच चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
बैठकीत आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आम आदमी पार्टी ताकदीने उतरणार असल्याचा ठराव पारित करण्यात आला. तसेच ज्या कार्यकर्त्यांना नगर पालिका निवडणूक आम आदमी पक्षाकडून लढवायची आहे, त्यांनी जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार मो. 9665656601 आणि मुल तालुका अध्यक्ष कवडू येनप्रेडीवार मो. 9923156116 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
🟢 आम आदमी पक्षाचे कार्य आणि जनाधार
आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल घडवून आणले आहेत. शाळांचे उन्नतीकरण, मोहल्ला क्लिनिकची संकल्पना, मोफत वीज आणि पाणी योजनांमुळे जनतेचा विश्वास मिळवण्यात पक्ष यशस्वी ठरला आहे. आता महाराष्ट्रातही पक्षाने संघटन मजबूत करून लोकांच्या प्रश्नांवर लढा देण्याचा निर्धार केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्न जसे की बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपुऱ्या सुविधा या मुद्द्यांवर आम आदमी पक्षाने सातत्याने आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये AAP ताकदीने उतरून जनतेच्या मनातील पर्याय ठरणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
#AamAadmiParty #Chandrapur #Election2025 #AAPMaharashtra #PoliticalMeeting #GrassrootPolitics #AAPForPeople #DelhiMLA #PrakashZarawar #AjitKatle #BhushanThakarkar #SunilMusale #MayurRaikwar #KavaduYenprediwar #DeepakraoBershettiwar #SunilBhoyar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.