आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०९ सप्टेंबर २०२५) -
शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडले. मात्र रात्री दहा वाजता डीजे बंद करण्यावरून पोलिस व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार रात्री दहा वाजता डीजे थांबवण्याची अट घालण्यात आली होती. यावर काही मंडळांचे कार्यकर्ते नाराज झाले आणि मिरवणुकीत थोडा काळ तणाव निर्माण झाला.
या प्रसंगी पोलिसांनी डीजे थांबवण्याचा प्रयत्न केला असता काही ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक धुसफूस झाली. मंडळांचे कार्यकर्ते अर्धा तास डीजे वाजवण्याची परवानगी मागत होते. मात्र कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिस ठाम राहिले.
स्थिती चिघळू नये म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगरसेवक राजू डोहे, विनायक देशमुख, बंडू वनकर, राजू गौरशेट्टीवार, मिलिंद देशकर आदीनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना मध्यस्थी केली. त्यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला आणि विसर्जन मिरवणुकीचा कार्यक्रम शांततेत पार पडला. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी पोलिस व मंडळ कार्यकर्त्यांचे आभार मानत संयम राखल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे अखेर गणेश विसर्जनाचा समारोप शांततेत झाला.
#GaneshVisarjan #RajuraNews #CommunityPeace #PoliceAndPublic #DJBanIssue #FestivalHarmony #PeacefulVisarjan #FormerMayor #ArunDhote #formercorporator #RajuDohe #VinayakDeshmukh #Banduwankar #RajuGaurshettiwar #MilindDeshkar #rajuraupdate #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.