आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०९ सप्टेंबर २०२५) -
बी.एस.एन.एल. च्या कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक करून मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत चोरीचा माल व इतर साहित्य असा एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक ०६/०९/२०२५ रोजी फिर्यादी अभियंता अशोक जिवणे वय ४५ वर्षे, रा. चंद्रपूर यांनी पोलिस ठाणे रामनगर येथे तक्रार दिली होती की, बी.एस.एन.एल. कंपनीची २८ लाख रुपयांची कॉपर केबल चोरीस गेली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींवर नजर ठेवून चौकशी केली असता आरोपी नामाज शेख असमुद्दीन शेख वय २२ वर्षे, रा. उमेद नगर, बदरू, उत्तरप्रदेश व आरोपी कलपती दोहरी वय २६ वर्षे, रा. उत्तरप्रदेश यांना पकडण्यात आले. आरोपींनी कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एक अशोक ले-लेण्ड ट्रक क्र. युपी-२४ बीटी-७०४६ जप्त करण्यात आला. चोरीस गेलेली बी.एस.एन.एल.ची कॉपर केबल किमती २८ लाख रुपयांची तसेच इतर साहित्य हेल्मेट, रिफ्लेक्टर, जॅकेट, प्लास्टिक बॅरिकेट्स असा एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी कॉपर केबल चोरून तिचे तुकडे करून विक्रीसाठी नेल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर काटके, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोयरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बलराम झाडेकर, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गोरखकर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश भोयर, उपनिरीक्षक जाकिर शेख, पोलीस नाईक महाले, सचिन गुरुड, विशाल नेरकुंडे, जनार्दन, संतोष बेलपाडे, निलेश झाडे, वसीम खान, सचिन गेडाम, संजय मोरे, शंकर रहाटे, गजानन राऊत, गणेश डांगे, प्रवीण लिंगाडे, जितेंद्र यादव, रोशन झाडे, प्रवीण चौधरी, स्वप्नील ढवळे, राकेश बोंडे, महेश वाघमारे, निलेश उगले, सुमित यादव, हिटलाल डावरे, चापेगावकर, विशेष आरक्ष दल यांचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या या वेगवान आणि अचूक कारवाईचे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
#ChandrapurPolice #CrimeBranch #BSNLCableTheft #CopperCable #CrimeNews #PoliceAction #ChandrapurUpdates #JusticeServed #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.