Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: “जनसुरक्षा नव्हे, लोकशाही धोक्यात” – आंदोलनकर्त्यांचा एल्गार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरात महाविकास आघाडीचा स्फोटक ठिय्या! जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची गगनभेदी मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १० सप्टेंबर २०२५) ...
राजुरात महाविकास आघाडीचा स्फोटक ठिय्या! जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची गगनभेदी मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १० सप्टेंबर २०२५) -
        राजुरा शहर आज आंदोलनाच्या रणभूमीत परिवर्तित झाले होते. कारणच तसे होते – महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अन्यायकारक, लोकशाहीविरोधी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आक्रमक झाली. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि कम्युनिस्ट पक्षाने सयुक्तपणे ठिय्या आंदोलन छेडले. जोरदार घोषणाबाजी, निषेधाचे फलक, संतप्त नागरिकांचा जंगी लोंढा – अशा वातावरणात आंदोलनकर्त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. “जनसुरक्षा विधेयक रद्द करा अन्यथा तीव्र जनआंदोलन होईल” असा गगनभेदी नारा आंदोलनस्थळी घुमला.

        नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर आदिवासीबहुल, संवेदनशील जिल्ह्यांतील सामान्य जनता, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विरोधी मतधारकांना अन्यायकारक कारवायांना सामोरे जावे लागेल. पोलीस नियंत्रणाच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव सरकार खेळत आहे, असा आरोपही करण्यात आला.

        या भव्य आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन उरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, सभापती विकास देवाळकर, ॲड. अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, नर्सिंग मादर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, विलास तुमाने, रवि त्रिशूलवार, नंदकिशोर वाढई, अँड. रामभाऊ देवईकर, शंकर गोनेलवार, जंगू एडमे, बापू धोटे, कोमल फुसाटे, संतोष गटलेवार, अब्दुल जमीर, संतोष इंदूरवार, एजाज अहमद, इरशाद शेख, रामेश्वर ढवस, अँड. चंद्रशेखर चांदेकर, पंढरी चन्ने, रामनंदेश्वर गिरडकर, अजय बतकमवार, प्रणय लांडे, रमेश झाडे, धनराज चिंचोलकर, सुरज माथनकर, उमेश गोरे, अनंता एकडे, राजु पिंपळशेंडे, राजकुमार पाटील, संदीप नन्नवरे, श्याम गरडे, मतीन कुरेशी, अशोक राव, निरंजन मंडल, अनंता ताजने, रविंद्र आत्राम, कुणाल मोकळे, दिपक मडावी, साहील शेख, आकाश मावलीकर, मधुकर झाडे, मिथलेश रामटेके, सय्यद साबिर, संघपाल देठे, रोशन लांडे, आशाताई उरकुडे, नंदाताई मुसने, दिपाताई करमनकर, कविता उपरे, पूनम गिरसावळे, इंदूबाई निकोडे, सुशिला संदुरकर यांच्यासह असंख्य नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

#RajuraProtest #JanasurakshaBill #MVAProtest #SaveDemocracy #FreedomUnderThreat #VoiceOfThePeople #PeoplesMovement #subhashdhote #arundhote #sunildeshpande #advrambhaudevaikar #nandkishorwadhai #gajananbhatarkar #babanurkude #congress #shivsenaubt #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top