बहिणींनी दिले वृक्ष संगोपनाचे वचन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ११ ऑगस्ट २०२५) -
बामनवाडा येथील समानता बहुउद्देशीय एज्युकेशन सोसायटी संचालित राष्ट्रीय पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. येथे शाळेतील मुलींनी भावाला राखी बांधण्यासोबतच वृक्षारोपण करून निसर्गाशी बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.
या उपक्रमात कडुनिंब, जांभूळ, वड, पिंपळ, करंजी यांसारख्या उपयुक्त आणि दीर्घायुषी वृक्षांचे रोपण करण्यात आले. मुलींनी या झाडांना ‘वृक्षबंधू’ मानून त्यांचे संगोपन आणि संरक्षण करण्याची शपथ घेतली. आज अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते, मात्र नंतर त्या झाडांची निगा राखली जात नाही, हे लक्षात घेऊन मुलींनी पर्यावरणसंवर्धनासाठी हा अनोखा उपक्रम राबवला.
या उपक्रमाची राजुरा तहसील परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे. संस्थेचे संस्थापक मोहम्मद मुसा यांनी शाळेतील मुलींचे कौतुक करताना सांगितले की, अशा कृतीमुळे पुढील पिढीत पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि जबाबदारी वाढते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे प्राचार्य वैभव सर, इतर शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते.
#GreenRakshabandhan #TreeBond #NatureSisters #EcoFriendlyFestival #PlantAndProtect #SustainableTraditions #LoveForNature #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur #mehmudmusa #nationalpublicschool #bamanwada #samantabahuuddeshiyaeducationsociety

Ansh Narayan pohane
उत्तर द्याहटवा