Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: २ ऑक्टोबरला एकत्र येणार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
२ ऑक्टोबरला एकत्र येणार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकतेचा उत्सव आमदार सुधाकर अडबाले यांची विशेष उपस्थ...
२ ऑक्टोबरला एकत्र येणार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे
पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकतेचा उत्सव
आमदार सुधाकर अडबाले यांची विशेष उपस्थिती 
यहोवा यिरे फाऊंडेशनचे आयोजन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
चंद्रपूर (दि. 9 ऑगस्ट २०२५) -
        यहोवा यिरे फाऊंडेशनच्या बहुआयामी सामाजिक कार्याची गगनभरारी आता संपूर्ण नागपूर विभाग आणि त्याहून पुढे पोहोचली आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यावरण आणि समाजकार्याच्या विविध क्षेत्रांतील अपवादात्मक योगदानामुळे संस्थेने सामाजिक बदलाच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू केला आहे. या सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीवर, येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी जयंती व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त “आदर्श शिक्षक, डॉक्टर, उद्योगरत्न व सामाजिक कार्य पुरस्कार सोहळा” भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले उपस्थित राहणार आहेत.

        मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रमेशकुमार, ज्येष्ठ पत्रकार डी. के. आरीकर आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. देव कन्नाके यांनी आमदार अडबाले यांच्या निवासस्थानी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, पुरस्कार सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण दिले. आमदार अडबाले यांनी आनंदाने हे निमंत्रण स्वीकारले असून, सोहळ्यास आपली उपस्थिती निश्चित केली आहे.

        संस्थेच्या शिक्षण विभागाने ग्रामीण व शहरी भागातील शेकडो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य मोहिमांत मोफत तपासणी, जनजागृती शिबिरे व औषधोपचारामुळे हजारो कुटुंबांना आरोग्य लाभले आहे. उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, पर्यावरण संवर्धन मोहिमांनी परिसरातील निसर्ग व वनस्पतींचे रक्षण करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. या उपक्रमांनी समाजातील अनेक घटकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणला असून, संस्थेचे हे कार्य भविष्यातही प्रेरणादायी ठरणार आहे.

#JehovahJirehFoundation #SocialChange #NagpurDivision #AwardCeremony2025 #InspiringInitiatives #EducationForAll #HealthcareForAll #EnvironmentalCare #MLA #sudhakaradbale #drrameshkumarborkute #dkarikar #drdevkannake #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top