आदिवासी संस्कृती, परंपरा, जीवनशैली आणि निसर्गाशी असलेले नाते हे आपल्या वारशाचा अविभाज्य भाग - अरुण धोटे
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 9 ऑगस्ट २०२५) -
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोनिया नगर वॉर्डात आदिवासी समाजाचा विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत राजुरा नगर परिषद माजी नगराध्यक्ष अरुण धोटे (Ex Mayor Arun Dhote), नगरसेवक हरजीत सिंग संधू (Harjit Singh Sandhu) यांचा समावेश होता.
सोनिया नगर वॉर्डातील आदिवासी समाजाचे युवा नेते रविंद्र आत्राम (Ravindra Atram) यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात अरुण कुमरे, सुरेश टेकाम, मालताबाई मडावी, सुजित आडे, मंगला आत्राम, शोभाबाई मेश्राम, माधुरी वेलादे, वाचला सिडाम, किरण मडावी या महिला व पुरुष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच आदिवासी समाजातील युवा कार्यकर्ते संतोष मडावी, किसन आत्राम, कवडू आत्राम, राकेश उईके, प्रसाद मेश्राम, रमेश मेश्राम, महेश सिडाम, विनोद सोयाम यांसह विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
भाषणात अरुण धोटे यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, "आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा मूळ आधार आहे. त्यांच्या परंपरा, जीवनशैली आणि निसर्गाशी असलेले नाते हे आपल्या वारशाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या पिढीने या वारशाचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत." या कार्यक्रमाद्वारे आदिवासी संस्कृती, परंपरा आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला.
#WorldTribalDay #TribalPride #RajuraCelebrates #AdivasiHeritage #CulturalUnity #VidarbhaUpdates #TribalCulture #ExMayor #arundhote #ravindraatram #HarjitSinghSandhu
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.