''धाग्यात गुंफलेला विश्वास आणि जबाबदारीचा संदेश''
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ९ ऑगस्ट २०२५) –
राखीचा धागा हा केवळ नात्याचा नव्हे तर विश्वास आणि सुरक्षेचा प्रतीक आहे. याच भावनेतून बल्लारपूर मनसे महिला सेनेच्या वतीने पोलीस दलात रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार आणि जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच बल्लारपूर तालुका अध्यक्ष कल्पना पोर्तलावार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विपीन इंगळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस बांधवांना महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी राखी बांधून त्यांचे कार्य अधिक सक्षम राहावे, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रबळ व्हावे, असा संकल्प व्यक्त केला. महिला कार्यकर्त्यांनी सांगितले की, महिलांवरील मानसिक व शारीरिक अत्याचार थांबले पाहिजेत आणि प्रत्येक महिलेला स्वातंत्र्यपूर्वक व सुरक्षितपणे फिरता आले पाहिजे. अलीकडेच चंद्रपूर शहरात दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली असून, अशा गुन्हेगारीवर पोलिसांनी अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमात भावना मेश्राम, माया गाऊकर, वैष्णवी बुरेवार, वैष्णवी कोब्रागडे, धुरपता उबडे, लता तपसाडे, वैशाली बुरेवार यांसह महिला सेनेच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून, ‘महिलांचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव वचनबद्ध राहू’ हा संदेश दिला. हा उपक्रम महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाजात एक सकारात्मक संदेश पसरवणारा ठरला.
#RakshaBandhanWithPolice #SafetyBond #WomenSafetyFirst #SecureSisters #TyingTrust #PoliceProtectionPledge #MNSWomenWing #BallarpurEvent #StopCrimeAgainstWomen #SafetyPromise #ballarpur #MNSMahilaSena #ballarpurnews #ballarpurupdate #ballarpurpolicestation #VipinIngle #RahulBalamwar #KishoreMadgulwar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.