आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०७ जुलै २०२५) -
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राजुरा तालुक्यातील गोवरी येथील मोहनगिरी बाबा मंदिर परिसरात आधुनिक महाराष्ट्राचे संत, स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. सदर पुतळ्याची प्रतिष्ठापना गावातील ज्येष्ठ नागरिक जंगलूजी दरेकर यांचे हस्ते विधिपूर्वक करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात भाग घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व संयोजक गावातील ग्रामस्थ व मोहनगिरी बाबा मंदिर व्यवस्थापन होते.
कार्यक्रमाचे संचालन करताना शंकर दरेकर यांनी संत गाडगेबाबांच्या विचारांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “संत गाडगेबाबा हे स्वच्छता, सेवा आणि सामाजिक समतेचे प्रतीक होते. त्यांच्या विचारांची प्रेरणा ही आजही जिवंत आहे.” यावेळी उपस्थित प्रमुख नागरिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिदासजी बोरकुटे, जेष्ठ नागरिक मारोती पाटील लोहे, तुमडे महाराज, भाऊराव चतुरकर, महादेव दरेकर, पंढरी झाडे, अरुण भलमे, संभाशिव जुनघरी, दादाजी दरेकर, चरणदास दरेकर, गणेश दरेकर, विपुल लोहारे, प्रफुल दरेकर, प्रकाश काळे, पंचफुला दरेकर, ज्योती दरेकर, नम्रता दरेकर, शुभांगी दरेकर, प्रज्योती दरेकर आदींसह गावातील महिला, पुरुष आणि युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमात पवित्र पूजा विधी, सामूहिक दर्शन, आणि सामाजिक संदेशांचे वाचन घडले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.