Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोकुळ नगर वॉर्डात थंड पाण्याचे एटीएम कार्यान्वित : नागरिकांचा दिलासा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोकुळ नगर वॉर्डात थंड पाण्याचे एटीएम कार्यान्वित : नागरिकांचा दिलासा आमचा विदर्भ - राजेश अरोरा बल्लारपूर (दि. ०८ जुलै २०२५) -         गोकुळ ...
गोकुळ नगर वॉर्डात थंड पाण्याचे एटीएम कार्यान्वित : नागरिकांचा दिलासा
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ०८ जुलै २०२५) -
        गोकुळ नगर वॉर्डातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी एकादशी व मोहर्रमच्या निमित्ताने, गोकुळ नगर वॉर्डात थंड पाण्याचे एटीएम कार्यान्वित करण्यात आले. वॉर्डातील ८ ते १५ हजार लोकसंख्या अनेक दिवसांपासून या सुविधा मिळावी अशी मागणी करत होती. या मागणीची दखल घेत माजी नगरसेवक सिक्की यादव यांनी मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून कलामंदिरजवळील ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्यास मंजुरी देण्यात आली. याचा शुभारंभ आज ज्येष्ठ नागरिक बागडे काका यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मुख्याधिकारी विशाल वाघ व माजी नगरसेवक सिक्की यादव यांचे आभार मानले.

        यावेळी माजी नगरसेवक सिक्की यादव, मुख्याधिकारी विशाल वाघ, माजी नगरसेविका रंजीता बीरे, सविता नाईक, एटीएम ऑपरेटर कुणाल धकाते, पाठक, शहर अध्यक्ष बाबा साहू, समाजसेवक व नागरिक क़नोबा बांगडे, संजू चार्ल्स, नाना वाकुडकर, राजू मेकलवार, दस्तगीर शेख, यूसुफ शेख, दशरथ नंदाराम, दिलीप नाइक, ओमप्रकाश शाह, सुनील जायसवाल, अशोक पटेल, अशोक नाइक, मनोज मुखिया, मोनू शर्मा, श्रवण दुबे, ईश्वर सोमकुंवर, प्रवीण दड़मल, विद्याभूषण राय, संतोष वर्मा, फ़ज्जू शेख, सलीम शेख, शनील जैसवाल, विजय गावनडे, राकेश तिवारी, मिश्रा, रामटेके, अशोक महतो व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top