Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खासदार प्रतिभा धनोरकर यांच्या हस्ते मच्छरदानी वाटपाचा शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार प्रतिभा धनोरकर यांच्या हस्ते मच्छरदानी वाटपाचा शुभारंभ नवजात बालकांसाठी JCI चंद्रपूरचा आरोग्यदायी उपक्रम ‘१०० दिवस, १०० मच्छरदानी’ – ...
खासदार प्रतिभा धनोरकर यांच्या हस्ते मच्छरदानी वाटपाचा शुभारंभ
नवजात बालकांसाठी JCI चंद्रपूरचा आरोग्यदायी उपक्रम
‘१०० दिवस, १०० मच्छरदानी’ – चंद्रपूरमध्ये सामाजिक जागृतीसाठी पुढाकार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०८ जुलै २०२५) -
        (JCI chandrapur) JCI चंद्रपूरतर्फे राबवण्यात येत असलेल्या ‘१०० दिवस मच्छरदानी वाटप’ उपक्रमाचा तिसरा दिवस आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सामाजिक उपक्रमाअंतर्गत नवजात बालकांच्या आरोग्यासाठी मोफत मच्छरदानीचे वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांपासून बचाव होण्यास मदत होत असून, नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणली जात आहे. कार्यक्रमास संसदेच्या सदस्य खासदार प्रतिभा धनोरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते बालकांना मोफत मच्छरदानीचे वाटप करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे आणि सिव्हिल सर्जन डॉ. चिंचोले, 

        JCI चंद्रपूर चे अध्यक्ष चेतन रामटेके, IPP राजेंद्र रघाटाते, PP अरविंद सोनी, सदस्य अभिषेक काष्टीया, निसार शेख, महेंद्र जोशी, चेतन यादव, महेंद्र जोगी, सचिव संकेत पिंपळकर, महिला सदस्य काजल कुकरेजा, स्वयंसेवक धीरज राठी आदी सह जेसी सदस्य उपस्थित होते. 

या उपक्रमाची वैशिष्ट्ये:
  • गरजू कुटुंबांकरिता मोफत मच्छरदानी वाटप
  • १०० दिवसांचे सातत्यपूर्ण आयोजन
  • डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधासाठी जनजागृती
  • नवजात बालकांच्या आरोग्यसंवेदनशीलतेवर भर

        JCI चंद्रपूरचे अध्यक्ष चेतन रामटेके यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम अधिक प्रभावीपणे पार पडत असून, शहरात सकारात्मक सामाजिक संदेश देत आहे. कार्यक्रमात उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, या जनहित उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top