व्याख्याला उपस्थित राहण्याचे सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांचे आवाहन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २२ ऑक्टोबर २०२४) -
प्रसिद्ध व्याख्याते तथा समाज प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान दि. दि. २२ ऑक्टोबर ला स्वयंवर मंगल कार्यालय, गडचांदूर रोड, राजुरा येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकांनी आपआपल्या किशोरवयीन मुलं, मुली यांना घेऊन अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी केले आहे.
सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल, टेलिव्हिजनचे आहे. यामुळे आपल्या किशोरवयीन मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत. चौका चौकांनी शाळा, कोचिंग क्लासेस, कॉलेज समोर टवाळखोड रोड रोमिओ मुलींच्या पाठलाग करत असतात. असे आपण नेहमी पाहत असतो यावर उपाय म्हणजे आपल्या मुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा किशोरवयीन मुली मनोमन विचार आत्मसात करतील तेव्हा समाजातील चित्र बदलेल आणि निश्चितच आई-वडिलांना मनस्ताप होणार नाही तसेच अनुचित प्रकारालाही आळा घालता येईल. या हेतूने सुप्रसिद्ध व्याख्याते तथा समूह समाज प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी परिसरातील माता-पालकांनी आपआपल्या शालेय, किशोरवयीन मुला - मुलींना घेऊन या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केले आहे.
#Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #VasantHankare #Lecture #Nasamajhleleaaibap

Timming Kay ahe ?
उत्तर द्याहटवा