राजुरा (दि. २० ऑकटोबर २०२४) -
राजुरा येथील जुने जिल्हा परिषद विद्यालय असून ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून ही इमारत बंद असून विद्यार्थ्यांना उपयोगात आणली जात नाही आहे. मागील चार वर्षांपासून पासून या पडीत इमारतीला स्वच्छ करून त्या ठिकाणी प्राणी संगोपन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुक्या प्राण्यांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न राजुरा येथील सेवाभावी महिला सतत करीत आहे. चार वर्षात 300 श्वाना करिता नसबंदी शस्त्रक्रिया करून देण्यात आले. नवजात पिल्याना उपचारासाठी आणून ज्यांना घरी न्यावयाचे आहे त्यांना मोफत देऊन मुक्या प्राण्यांना हक्काचे घर प्राप्त करून दिले आहे. या केंद्र मध्ये श्वान, गाय,मांजर असे प्राणी असून सेवाभावी नागरिकांच्या मदतीने दररोज त्यांना भोजनाची व्यवस्था केली आहे. प्राण्यासाठी पिंजरे, पलंग,कुलर, चारा, पाणी ची व्यवस्था करून एक प्रकारे समाजातील मुक्या जनावरांना मदत करून समाजाप्रती काही तरी देणं लागत या भावनेतून काम सुरू असून अपघात होऊन जख्मी झालेल्या प्राणांची दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. चार वर्षात शेकडो जनावरांना जीवनदान दिले आहे. ज्या ठिकाणी प्राणी संगोपन केंद्र आहे ती जागा आणि इमारत सरकारी रेकॉर्ड मध्ये सरकारी जागा असून जिल्हा विद्यालय कडे कुठले रेकॉर्ड नसल्याची माहिती आहे. मागील चार वर्षांपासून सुरू असलेले हे संगोपन केंद्र बंद करून इमारत खाली करण्याचा तगादा राजुरा येथील पंचायत समिती राजुरा येथील संवर्ग विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद विद्यालयचे प्राचार्य तगादा लावत आहे. हि जागा आम्हाला प्राण्यांसाठी देण्यात यावी अशी मागणी कृतिका सोनटक्के, रमा आईटलावार, रश्मी शाहु यांनी दिली आहे.
#Lakhmapur #government #administration #JantakiBaatNews #farmers #aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #ZillaParishadVidyalaya #AnimalCareCenter #Spayingsurgeryfordogs #PanchayatSamitiRajura #BlockDevelopmentOfficer #PrincipalZillaParishadVidyalaya
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.