Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ''स्वामीजीं'' च्या भेटीचे राजकीय रहस्य?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बतुकम्मा विसर्जन मिरवणुकीत भूषण फुसे यांनी नोंदविला सहभाग बतुकम्मा विसर्जन दरम्यान घेतली ''स्वामीजींची'' भेट आमचा विदर्भ - द...

बतुकम्मा विसर्जन मिरवणुकीत भूषण फुसे यांनी नोंदविला सहभाग
बतुकम्मा विसर्जन दरम्यान घेतली ''स्वामीजींची'' भेट
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. १८ ऑकटोबर २०२४) 
        बतुकम्मा उत्सव हा तेलगू भाषिकांचा महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. राजुरा तालुका तेलंगणा सीमेवर असून राजुरा तालुक्यात तेलगू भाषिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. स्थानिक जुन्या बस स्टॅन्ड जवळील तलावा जवळ तेलगू भाषिक दरवर्षी बतुकम्मा उत्सवाचे मोठ्या प्रमाणात सामूहिकरीत्या आयोजन करण्यात येते. आपल्या देशातील लोकांत सर्वधर्म समभाव विचारसरणी असल्याने या आयोजनात राजुरा व परिसरातील तेलगू भाषिक सोबतच इतरही समाजातील महिला व लोकांची खूप गर्दी असते. या आयोजनाच्या मंचावर राजकीय नेते सुद्धा हजेरी लावतात. 

        बतुकम्मा उत्सवा दरम्यान, शेवटच्या दिवशी, महिला बतुकम्मा घेऊन मिरवणूक काढतात आणि तलावांमध्ये विसर्जित करतात. जेष्ठ काँग्रेस नेते व माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार बतुकम्मा विसर्जन मिरवणुकीत असताना सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी ''स्वामीजींची'' भेट घेतली. भूषण फुसे यांनी बतुकम्मा उत्सवाच्या स्वामीजींना व तेलगूभाषिकांना शुभेच्छा दिल्या. जेष्ठ काँग्रेस नेते ''स्वामीजीं'' चे समाजात मोठे स्थान आहे. तेलगू भाषिकांसोबतच इतरही तळागाळातील समाजातील सामान्य माणूस ''स्वामीजीं'' शी जुडलेला आहे. गरजवंतांना कठीण प्रसंगी ते सरळ हाताने मदत करीत असतात त्यांनी एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळत नाही असे लोकांचे म्हणणे आहे. मिरवणुकीनंतर ''स्वामीजीं'' व भूषण फुसे यांनी प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेत दोघात काय बोलणे झाले हे मात्र कळू शकले नाही. दरम्यान ''स्वामीजीं'' ने सुद्धा भूषण फुसे यांच्या कार्याची प्रशंसा करत ''विजयी भवः'' आशीर्वाद दिल्याचे समजते. ''स्वामीजीं'' व सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या या भेटीने राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

#Batukamma #BatukammaUtsav #BatukammaFestival #agriculturalculture #traditionalfestive #indianculture #BathukammaUtsavSamiti #colorfulflowers #Gaupuram #Folksong #BathukammaParikrama #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #Congress #SwamiYerolwar #Telangana #Teluguspeaking #egalitarianideology

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top