Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतमजूर ''टेकाम'' कुटुंबियांना २० लाखाचे आर्थिक सहाय्य्य करा - भूषण फुसे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी घेतली मृत शेतमजुराचा कुटुंबीयांची भेट लखमापूर येथील शेतमजूराचा रोटावेटर मध्ये अडकून झाला होता मृत्यू गडचा...

सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी घेतली मृत शेतमजुराचा कुटुंबीयांची भेट
लखमापूर येथील शेतमजूराचा रोटावेटर मध्ये अडकून झाला होता मृत्यू
गडचांदूर (दि. १८ ऑकटोबर २०२४) -
        ट्रॅक्टरला लावलेल्या रोटावेटर मध्ये अडकून मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि. १६ ऑकटोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे घडली होती. रमेश शामराव टेकाम वय ४७ वर्षे असे मृत शेतमजुरांचे नाव आहे. रब्बी शेतीचा हंगाम सुरु झाल्याने ट्रॅक्टर मालक रवींद्र गोपाळ वडस्कर यांनी आपल्या गोठ्यातून ट्रॅक्टर बाहेर काढले. यावेळी त्यांच्याकडे कामावर असलेले शेतमजूर रमेश टेकाम यांना रोटावेटर मध्ये अडकलेली माती साफ करण्यास सांगितले. दरम्यान माती साफ करीत असताना ट्रॅक्टर सुरु केल्याने त्यामध्ये अडकून रमेश टेकाम यांच्या शरीराचे तुकडे झाले व त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता. 

        दि. १८ ऑकटोबर ला सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी मृतक शेतमजूर रमेश टेकाम यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले व झालेला प्रकाराबद्दल माहिती घेतली. टेकाम कुटुंबीयांनी सांगितले कि त्यांची मागणी वीस लाखाची असताना फक्त एक लाख देण्यात आले व अजून दीड लाख देतो असे सांगण्यात आले. टेकाम कुटुंबीयांची मागणी वीस लाखाची असताना पोलिसांनी मजूराने आपला जीव निष्काळजीपणा गमावला असे कुटुंबियांना सांगितले. भूषण फुसे यांनी पोलिसांच्या या कृत्याचे निषेध नोंदवत मजुराला न्याय मिळवून देत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत टेकाम कुटुंबीयांना वीस लाखाची मदत मिळालीच पाहिजे असे सांगितले. याबाबत पोलिसांना व कुटुंबियांचे म्हणण्याची चित्रफीत सोशलमिडीयावर प्रसारित करण्यात आली असून जो पर्यंत टेकाम कुटुंबीयांना वीस लाखाची मदत मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी दिला आहे.

#agriculturallaborer #Lakhmapur #deathoffarmlaborer #Korpana #Socialworker #BhushanFuse #government #administration #JantakiBaatNews #farmers #aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Talodhi #Bakhardi #GadchandurBhoyegaonMarga

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top