Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महाकाली कॉलरीत खुन करणाऱ्या तीन आरोपीस अवघ्या दोन तासात अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १६ ऑकटोबर २०२४) -         दि. १५/१०/२०२४ रोजी महाकाली वार्ड चंद्रपूर येथ...
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १६ ऑकटोबर २०२४) -
        दि. १५/१०/२०२४ रोजी महाकाली वार्ड चंद्रपूर येथिल नामे आर्यन वासुदेव आरेवार यास महाकाली वार्डातील काही लोकांनी संघनमत करून जुन्या वादावरून वैमनस्यातुन कट रचुन धारधार हत्याराने मारहान करून त्याचा खुन करत घटना स्थळावरून मोटारसायकल ने पसार झाले होते. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार याना मिळताच पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास करून अवघ्या दोन तासातच सदर पळून गेलेल्या आरोपीस राजुरा तालुक्यातील चुनाळा येथून पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. पोलिसांनी अश्वीन उर्फ बंटी राजेश सलमवार वय २८ वर्षे रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर, जॉन विलास बोलीवार वय १९ वर्षे रा. लालपेठ कॉलरी नं. १ चंद्रपूर, जसिम नसीम खान वय २४ वर्षे रा. जमनजटी दर्गा जवळ, चंद्रपूर याना अटक केली असून तिन्ही आरोपीतांनी गुन्ह्याची केल्याची कबुली दिल्याने आरोपीस पुढिल तपासकामी पोस्टे चंद्रपुर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.

        सदरची यशस्वी कामगीरी चंद्रपुर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पो.हवा. सुभाष गोहोकार ना.पो.कॉ संतोष येलपुलवार, पो.कॉ. गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार, मिलींद जाभुळे, दिनेश अराडे यांनी केली.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Crime #Murder #MahakaliColliery #LocalCrimeBranchChandrapur #MaheshKondawar #PoliceInspector #SuperintendentofPolice #MummakaSudarshan #Chunala #Rajurataluka #PoliceStationChandrapurCity

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top