Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विकासकामांचा अनुशेष संपविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता - ॲड. वामनराव चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. २२ ऑक्टोबर २०२४) -         राजुरा विधानसभा क्षेत्रात गेल्या 15 वर्षापासून विकासकामांचा मोठा अनुशेष बाक...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २२ ऑक्टोबर २०२४) -
        राजुरा विधानसभा क्षेत्रात गेल्या 15 वर्षापासून विकासकामांचा मोठा अनुशेष बाकी असून राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जीवती तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले. महाराष्ट्र कर्जात बुडाल्याने आपल्या भागातील कामांसाठी विधानसभेत सरकारला धारेवर धरून विविध विकासकामे खेचून आणणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

        १५७ कोटींची विकासकामे, वर्धा नदीवर सात मोठी पूले, ग्रामीण रस्ते, शासकिय इमारती यांची निर्मीती, कोलांमासाठी विशेष योजनेतून घरकुल निर्मीती, आरोग्य केंद्र, राजुरा व गडचांदूर बसस्थानक, विविध समाज व अल्पसंख्यांक साठी समाजभवन, शासकिय वसतीगृह, १२ गावांचा प्रश्न यासह अनेक कामे झाली. मात्र गेल्या पंधरा वर्षात विकासाची गती मंदावली. ३६ पुलांचा अनुशेष शिल्लक राहिला, तो १५ वर्षानंतरही आजही तसाच कायम आहे. गडचांदूर, जिवती व कोरपना बस स्थानकाची मागणी प्रलंबित राहिली. पांधन रस्त्यांची कामे रखडली आहे. महाराष्ट्रात नविन तालुक्यात न्यायालय निर्माण करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला, त्यातील एकुण ५३ तालुक्यापैकी ५२ तालुक्यात न्यायालये झाली, मात्र फक्त जीवती येथे न्यायालय झाले नाही. जमिनीच्या पट्ट्याच्या प्रश्नावर अपयश आले. स्थानिक युवकांना रोजगारातून डावलले जात आहे. महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होतांना दिसतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

        शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्ती, शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, सिंचन प्रकल्प विकास, युवकांच्या रोजगारासाठी स्थानीय शब्दाची व्याख्या बदलविणे, बिरसा मुंडा - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर - महात्म्या फुले - अहिल्याबाई होळकर या सारख्या महापुरूषांच्या नावाने वाचनालय व अभ्यासिकांची निर्मिती, स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न, कामगार व मजुरांना किमान वेतनाचे प्रश्न व सुखसुविधा, वेकोलितील नोक-यांचे प्रलंबित प्रश्न, कापूस - सोयाबिन - धान या शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, ड्रॅगन पॅलेस च्या धर्तीवर बुध्दभुमीचा विकास, कर्मचा-यांची जुनी पेंशन लागू करणे यासारखे ज्वलंत प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिली आहे.

        या राजुरा विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटना समर्थीत परिवर्तन महाशक्ती आघाडी ची काॅग्रेस च्या उमेदवारासोबत थेट लढतीचे चित्र आहे. भाजपाची अंतर्गत गटबाजी व काॅग्रेस पक्षांतर्गत नाराजी, विकासकामांबाबतची जनतेची प्रचंड निराशा हे मुद्दे चर्चेत राहणार आहेत. प्रहार चे बच्चू कडू, स्वाभीमानीचे राजु शेट्टी, माजी मंत्री शंकरअण्णा धोंडगे आदी मान्यवर नेते राजुरा भागात प्रचारासाठी येणार आहे. गेल्या ४५ वर्षापासून शेतकरी चळवळीशी एकनिष्ठ राहून राजुरा विधानसभा क्षेत्राशी आपली नाळ जुळळी असून जात, धर्म, पक्ष आदी भेदांपलिकडे जाऊन अनेकांशी स्नेहाचे ऋणानुबंध असून असल्याने परिवर्तन अटळ असल्याची भुमिका चटप यांनी मांडली. आहे. आगामी विधानसंभेत आमदार म्हणून कार्य करण्याची संधी देण्याची मागणी जेष्ठ शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांनी केली.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #AdvWamanraoChatap #WamanraoChatap #RajuraAssemblyConstituency #Election2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top