Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भूषण फुसे यांनी साई पालखीत ध्वज हातात घेत नोंदविला सहभाग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
साईबाबा मंदिरात पुण्यतिथी निमित्य घेतले दर्शन राजुरा (दि. २० ऑकटोबर २०२४) -         श्री साई आरती सेवा मंडळ तथा साईभक्तां कडून दरवर्षी राजुर...
साईबाबा मंदिरात पुण्यतिथी निमित्य घेतले दर्शन
राजुरा (दि. २० ऑकटोबर २०२४) -
        श्री साई आरती सेवा मंडळ तथा साईभक्तां कडून दरवर्षी राजुरा - बल्लारपूर मार्गावरील साई मंदिरात ''सबका मलिक एक'' अशी सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे श्री साईबाबा च्या जयंती व पुण्यतिथी निमित्य कार्यक्रम होत असतात. या वर्षी सुद्धा आज श्री साईबाबा च्या पुण्यतिथी निमित्य श्री साई पालखी साईबाबा मंदिरापासून वर्धा नदीपलीकडील श्री हनुमान व संत जलाराम बाप्पा मंदिरापर्यंत काढण्यात आली. या पालखीत सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी ध्वज हातात घेत सहभाग नोंदविला. साई पालखीत शेकडो साई भक्तांनी उपस्थिती दर्शविली. पालखी नंतर मंदिरात समाजप्रबोधनकार शीतलताई साबळे पाटील यांचे प्रवचन झाले. पालखीत सहभागी होऊन प्रवचनात उपस्थित महिला व पुरुष साई भक्तांना सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी स्वतःच्या हाताने पाणी वितरित केले. भूषण फुसे यांच्या सेवाभावाने साईभक्त भारावले. साई चरित्र व शाल, श्रीफळ देऊन आयोजन समितीचे स्वागत भूषण फुसे यांनी केले. अनेक मान्यवरांनी साई मंदिरात उपस्थिती दर्शविली. प्रवचनानंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री साई आरती सेवा मंडळ तथा साईभक्तांनी परिश्रम घेतले. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #SaiPalakhi #SaibabaMandir #WardhaNadi #JalaramBappaMandir #HanumanMandir #Socialeducator #SheetaltaiSablePatil #discourse #Pravachan #Saibhakta

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top