बल्लारपूर: वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर 'आक्रोश मोर्चा'
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ०८ जुलै २०२५) -
शहरातील पाणीपुरवठा समस्येवर तीव्र नाराजी व्यक्त करत वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडी बल्लारपूर शहर यांच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शहराध्यक्ष उमेश कडू यांनी केले, तर महिला शहराध्यक्ष रेखाताई पागडे यांनी मोर्चाचे सूत्रसंचालन केले. या मोर्चात प्रमुखतः २४ तास शुद्ध पाण्याचा पुरवठा, सरसकट सरासरी पाणीबिल आकारणी, आणि एक वर्षासाठी अभय योजना राबवावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे वरिष्ठ अधिकारी कटके सर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी शहराध्यक्ष उमेश कडू, महासचिव गौतम रामटेके, संघटक राकेश पेटकर, प्रियंकेश शिंगाडे, किरण रामटेके, नम्रता साव, सविता थुलकर, पंचावेले, प्रतिमा खेकारे, देवराम नंदेश्वर, परमानंद भडके, अशोक भावे व अन्य कार्यकर्ते आणि नळग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष प्रभू दाजी देवगड यांनी मानले.
मागण्यांचा ठळक आढावा:
- २४ तास शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा
- सरसकट सरासरी बिल आकारणीची अंमलबजावणी
- एक वर्षासाठी अभय योजना लागू करणे
- अशुद्ध, गढूळ पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा
- बिल व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी
इशारा आणि पुढील कार्यक्रम:
मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीने म.जी.प्रा. प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली असून, मागण्या मान्य न झाल्यास ग्राहक न्यायालयात न्यायहक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. १५ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता म.जी.प्रा. गेटवर तक्रार संकलन शिबिर घेण्यात येणार असून, नागरिकांनी आपले प्रश्न व समस्या घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.