Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुर्गा मंदिरापासून सुरू होणार "ग्रीन गडचांदूर" चा हरित प्रवास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुर्गा मंदिरापासून सुरू होणार "ग्रीन गडचांदूर" चा हरित प्रवास श्रीतेज प्रतिष्ठानचा पुढाकार: हरित परिवर्तनाची दिशा आमचा विदर्भ - (प...
दुर्गा मंदिरापासून सुरू होणार "ग्रीन गडचांदूर" चा हरित प्रवास
श्रीतेज प्रतिष्ठानचा पुढाकार: हरित परिवर्तनाची दिशा
आमचा विदर्भ - (प्रतिनिधी)
गडचांदूर (दि. ०७ जुलै २०२५) -
        स्थानिक श्रीतेज प्रतिष्ठान च्या वतीने "ग्रीन गडचांदूर" या पर्यावरण संवर्धन मोहिमेच्या अनुषंगाने शरदराव पवार महाविद्यालय येथे एक सुसंगत आणि प्रेरणादायी आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक श्रीतेज प्रतिष्ठान निलेश ताजणे यांनी केले. निलेश ताजणे यांनी "ग्रीन गडचांदूर" या पर्यावरण संवर्धन मोहिमेच्या अनुषंगाने उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण व संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. गडचांदूर शहर हरित व प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामूहिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे त्यांनी सांगितले. मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीची रुजवणूक हेच अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय कृती कराव्यात, याबाबत विविध मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

        मार्गदर्शक म्हणून शिक्षणतज्ज्ञ गुरूजी विठ्ठलराव थिपे, सामाजिक कार्यकर्ते विलासराव धांडे, पर्यावरण अभ्यासक डॉ. किसनराव भोयर, शिक्षणतज्ज्ञ हंसराज चौधरी, पर्यावरणप्रेमी मोहितकर गुरूजी, निवृत्त शिक्षक गुरूजी हरिश्चंद्र थिपे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी पोतनुरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकरे, प्राध्यापक डॉ. दुधगवळी सर, उद्योजक धनंजय छाजेड, पर्यावरण कार्यकर्ते मनोज भोजेकर, सामाजिक कार्यकर्ते नासिर भाई, युवा प्रतिनिधी कार्तिक कुचणकर, सामाजिक नेते रफिकभाई निजामी, स्वच्छता अभियान समन्वयक विजय ठाकरे या मान्यवरांनी सुद्धा आपले विचार मांडले. 

        बैठकीला गडचांदूर शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, युवा प्रतिनिधी तसेच श्रीतेज प्रतिष्ठानचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध स्तरांतील नागरिकांनी "ग्रीन गडचांदूर" मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपले अमूल्य विचार, सूचना मांडल्या. बैठकीत मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सखोल चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन खरवडे गुरूजी यांनी केले, तर तुळशिराम पानघाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top