आमचा विदर्भ -
राजुरा (दि. ०७ जुलै २०२५) –
शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणाविरोधात अखेर अंशतः अनुदानित शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक आंदोलनाच्या मार्गावर! ८ व ९ जुलै २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेण्यात आला आहे.
१४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने अंशतः अनुदानित शाळा व महाविद्यालयांना वाढीव अनुदानाचा टप्पा देण्याचे लेखी आश्वासन देत संबंधित शासन निर्णय (G.R.) काढला होता. मात्र, सप्टेंबर महिना संपत आला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही, यामुळे राज्यातील सुमारे ५२ हजार शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.
चालू पावसाळी अधिवेशनातही १४ शिक्षक आमदारांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला, तरीही सरकारकडून “आज होईल, उद्या होईल” अशा उडवाउडवीच्या उत्तरांनी केवळ आश्वासनच दिले गेले. यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.
- या आंदोलनाअंतर्गत ८ व ९ जुलै रोजी शाळा पूर्णपणे बंद राहणार
- शाळा बंदचे निवेदन जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपूर्द
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील टप्प्यात तीव्र आंदोलनाची चेतावणी
या आंदोलनात शिक्षकांनी स्पष्टपणे सांगितले की, "आम्हाला आश्वासने नको, आम्हाला अंमलबजावणी हवी!" आता यावर शासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.