"एक पेड मा के नाम" उपक्रमाने दिला हरित संदेश
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०७ जुलै २०२५) –
दिनांक ४ जुलै रोजी शुक्रवारला बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ राजुरा द्वारा संचालित अब्दुल गणी पटेल विद्यालय देवाडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय देवाडा येथे संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय पटांगणात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. "एक पेड मा के नाम" या अभिनव उपक्रमांतर्गत पाहुण्यांच्या हस्ते व विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वसुंधरेचे रक्षण, हिरवळ वाढविणे आणि भविष्यासाठी संतुलित पर्यावरण राखण्याचे महत्त्व संस्थाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
कार्यक्रमात फेब्रुवारी व मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. अब्दुल गणी पटेल विद्यालय येथील इयत्ता दहावीतील प्रथम तीन विद्यार्थी साक्षी सोनुले, पूजा गुरनूले, शबनम शेख तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता बारावीतील प्रथम तीन विद्यार्थी नेहा शेख, मेघा कोल्हे, कृष्णा जाधव या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, संस्थेच्या सचिव गीता पथाडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर रायपुरे, ईश्वर देवगडे, सिद्धार्थ रणवीर, पालक प्रतिनिधी मनोहर जाधव, संस्थेच्या सदस्या स्नेहा देव शाळेच्या व महाविद्यालयाच्या शिक्षकीय व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक प्रकाश गिरसावळे, प्राचार्य प्रदीप उपरे, सहायक शिक्षक हिनेश जाधव, रमेश राठोड, शिक्षिका दुर्गाश्री वाढई, निलिमा सूर, कर्मचारी आकाश ढवळे, प्रेमदेव मत्ते, संदीप डाहूले, मारोती गव्हारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या अभिनंदन व पर्यावरण रक्षणाच्या संकल्पाने करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.