Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सुकडपल्ली ग्रामस्थांचा संताप; खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुकडपल्ली ग्रामस्थांचा संताप; खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त युवकांचा टेक्नोप्रयोग - सोशल मीडियावरून उठवला आवाज! आमचा विदर्भ - (प्रतिनिधी) र...
सुकडपल्ली ग्रामस्थांचा संताप; खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त
युवकांचा टेक्नोप्रयोग - सोशल मीडियावरून उठवला आवाज!
आमचा विदर्भ - (प्रतिनिधी)
राजुरा (दि. ०७ जुलै २०२५) –
        राजुरा तालुक्यातील सुकडपल्ली हे गाव राजुरा पासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर असले तरी तेथील नागरिक सध्या खराब रस्त्यामुळे गंभीर त्रास सहन करत आहेत. विशेषतः देवाडा - गडचांदूर मुख्य रस्त्यावरील टी-पॉईंट पासून सुकडपल्लीपर्यंतचा सुमारे ३ किमीचा अंतर्गत रस्ता पूर्णतः उखडलेला असून, जागोजागी मोठाले खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे रस्ता अदृश्य होतो आणि यामुळे दुचाकीस्वारांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना गंभीर दुखापती झाल्याची चर्चा सुरू आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी गावातील सुशिक्षित युवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमाने या रस्त्याचे व्हिडीओ व फोटो शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
        या संदर्भात स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सांगितले की, "हा रस्ता काँग्रेसच्या सरकारच्या काळात, म्हणजेच सन २००० मध्ये बनवण्यात आला होता. त्यानंतर आजतागायत या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती, डागडुजी किंवा देखभाल करण्यात आलेली नाही." त्यांनी असेही नमूद केले की, "दररोज आम्हाला देवाडा व राजुरा येथे ये-जा करावे लागते. खराब रस्त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे." तसेच वाघमारे यांनी शासनाला आवाहन करताना म्हटले, "भाजप सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर सुकडपल्ली रस्त्याची दुरुस्ती करून आम्हाला दिलासा द्यावा. रोजच्या प्रवासात जीव धोक्यात घालावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलावी."

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top