Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई – घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई – घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड दोन आरोपी अटकेत; जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ -  चंद्रपूर (...
चंद्रपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई – घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड
दोन आरोपी अटकेत; जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - 
चंद्रपूर (दि. ०५ जुलै २०२५) -
        दिनांक ५ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने गुन्हेगार शोध मोहिमेदरम्यान व पेट्रोलिंग करताना तीन घरफोडी व एक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १,९३,४००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

        गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर रेकार्डवरील गुन्हेगार अतुल उर्फ मुजोर विकास राणा वय २६, रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर व ऋषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम वय २४, रा. विसापूर यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनीही बल्लारपूर व रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचे तीन गुन्हे व राजुरा हद्दीत एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. हस्तगत मुद्देमाल तपशील: पोस्टे बल्लारपूर अ.क्र. ४६३/२०२५ कलम ३०५(ए), ३३१(४) भा.दं.सं. सोन्याचे मंगळसूत्र, चैन, दोन अंगठ्या, रेडमी मोबाईल रोख ४०० असा एकूण १,५३,४०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 

        पोस्टे राजुरा अ.क्र. ३११/२०२५, कलम ३०३, ३३१(४) भा.दं.सं. होंडा शाईन मोटारसायकल MH34X5159 किंमत ४०,०००, पोस्टे रामनगर अ.क्र. ४८४/२०२५ व ५७०/२०२४ कलम ३०५(ए), ३३१(३) भा.दं.सं. मुद्देमालाची माहिती एकत्रित किंमतीत समाविष्ट असे एकूण १,९३,४००/- चा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना बल्लारपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

        सदरची कारवाही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि दिपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंबोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंह, गणेश मोहुर्ले, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे, मिलिंद जांभुळे यांनी पार पाडली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने अत्यंत तत्परतेने पार पाडली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top