छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'चेतना यात्रेचा' पुण्यातून शुभारंभ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ जुलै २०२५) -
महाराष्ट्राच्या इतिहासाला दिशा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार देशभर करण्याच्या उद्देशाने पुणे येथून 'चेतना यात्रेचा' भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असून यासंदर्भातील माहिती जनार्दन पाटील यांनी ५ जुलै रोजी स्थानिक श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जनार्धन पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांचा इतिहास सुमारे ३५० वर्षांपूर्वीचा असूनही दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत त्यांच्या नावाने कोणतेही स्थायी कार्यालय नसणे ही शोकांतिका आहे. संपूर्ण भारताला शिवाजी महाराजांचा संघर्ष, न्याय, नीती आणि आदर्श माहित व्हावा, यासाठी ही चेतना यात्रा काढली जात आहे. या यात्रेमध्ये पुणे, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जयपूर, गुजरात अशा विविध राज्यांचा समावेश असेल. यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावर होणार आहे.
यात्रेदरम्यान ग्रामीण भागात विशेष प्रगती करणाऱ्या व्यक्तींचा ‘शिवशौर्य’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचेही जनार्धन पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस अखिल भारतीय कुणबी महासंघाचे डि. के. आरीकर, महिला जिल्हाध्यक्ष विद्या चित्ताडे, जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे, संशिप्ता शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.