Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल – तिघांना अटक आमचा विदर्भ -  चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२५) –         चंद्रपूर जि...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल – तिघांना अटक
आमचा विदर्भ - 
चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२५) –
        चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली असून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून, त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

        पोलीस सूत्रांनुसार, 24 मे 2025 रोजी आरोपींनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे, या कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित केला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलगी व तिच्या वडिलांनी 11 जुलै 2025 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची पोलीसांनी तात्काळ व गंभीर दखल घेत तपास सुरु करत अवघ्या काही तासांत तीन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 70(2), कलम 123 पोक्सो कायदा अंतर्गत कलम 4, कलम 6, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66(ई), कलम 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रकरणातील कोणतेही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत. तसे आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top