Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "कबुली, अटक आणि दागिने हस्तगत – वरोरा पोलीसांची मोठी कामगिरी"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"कबुली, अटक आणि दागिने हस्तगत – वरोरा पोलीसांची मोठी कामगिरी" "चंद्रपूर गुन्हे शाखेचा चतुर सापळा – रेकॉर्डवरील गुन्हेगार पकडल...
"कबुली, अटक आणि दागिने हस्तगत – वरोरा पोलीसांची मोठी कामगिरी"
"चंद्रपूर गुन्हे शाखेचा चतुर सापळा – रेकॉर्डवरील गुन्हेगार पकडले"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२५) –
        दिनांक ११ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे तिघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून घरफोडी प्रकरणातील सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपी अनिल ऊर्फ कुंभकर्ण लोणारे, वय 30 वर्ष, रा. वरोरा, अरविंद ऊर्फ कावळा सातपुते, वय 38 वर्ष, रा. वरोरा, रंगा चिंतलवार, वय 55 वर्ष, रा. फिरस्ता या आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर पोलीस स्टेशन वरोरा, गु. र. क्र. 429/2025, भा.दं.सं. कलम 305(अ), 331(4) अन्वये घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास वरोरा पोलीस स्टेशन करीत आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, सफौ धनराज करकाडे, पोहवा अजय बागेसर, सचिन गुरनुले, चेतन गज्जलवार, पोअं किशोर वाकाटे, गणेश भोयर, प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नरोटे, चापोअं वृषभ बारसिंगे, मिलिंट काम शामिल होते. स्थानीय गुन्हे शाखा चंद्रपूरचे हे ताफा गुन्हेगारांवर वचक बसवण्यास सज्ज आहे, असे स्पष्टपणे या कारवाईतून दिसून आले आहे.


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top