Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुक्यातील 2025-2030 ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील 2025-2030 ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण जाहीर "कुठल्या गावाला कोणतं आरक्षण? जाणून घ्या संपूर्ण यादी!" आमचा विदर्भ...
राजुरा तालुक्यातील 2025-2030 ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण जाहीर
"कुठल्या गावाला कोणतं आरक्षण? जाणून घ्या संपूर्ण यादी!"
आमचा विदर्भ - 
राजुरा (दि. १२ जुलै २०२५) –
        राजुरा तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या व गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे चक्रानुक्रम व सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राजुरा तालुक्यात एकूण ६५ ग्रामपंचायती असून त्यातील ३३ ग्रामपंचायती (बिगर अनुसूचित क्षेत्र) करिता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार सरपंच पद आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

आरक्षणानुसार खालीलप्रमाणे ग्रामपंचायतींमध्ये आरक्षित पदांचे तपशील जाहीर झाले:

अनुसूचित जाती स्त्री सरपंच आरक्षित ग्रामपंचायती:
  • खामोना
  • पंचाळा
  • कोहपरा
  • कळमना

अनुसूचित जाती सर्वसाधारण सरपंच आरक्षित ग्रामपंचायती:
  • चिंचोली खुर्द
  • कोलगाव
  • धिडशी

अनुसूचित जमाती स्त्री सरपंच आरक्षित ग्रामपंचायती:
  • चंदनवाही
  • सास्ती
  • मंगी बु.
  • वरुर रोड
  • सोनुर्ली
  • सोंडो
  • विरूर स्टेशन
  • भेंडाळा
  • अंतरगावं (अन्नुर)
  • पाचगावं
  • देवाडा
  • भूर्कुंडा बु.
  • जामणी
  • सोनापुर
  • भेंडवी
  • अहेरी
  • गोयेगाव
  • टेंभूरवाही

अनुसूचित जमाती सर्वसाधारण सरपंच आरक्षित ग्रामपंचायती:
  • सातरी
  • वरोडा
  • पांढरपौंनी
  • हरदोना खु.
  • भेदोडा
  • लक्कडकोट
  • कोष्टाळा
  • डोंगरगावं
  • सुबई
  • येरगव्हान
  • भूर्कुंडा खू.
  • इसापूर
  • मानोली खुर्द
  • नोकारी खुर्द
  • साखरी
  • सिर्सी
  • मानोली बूज
  • कावडगोंदी

नागरिक मागास प्रवर्ग (OBC) स्त्री सरपंच आरक्षित ग्रामपंचायती:
  • बामनवाडा
  • नलफडी
  • पवनी
  • विहीरगाव

नागरिक मागास प्रवर्ग (OBC) सर्वसाधारण आरक्षित ग्रामपंचायती:
  • चुनाळा
  • गोवरी
  • कविठपेठ
  • चनाखा
  • धोपटाळा

सर्वसाधारण स्त्री सरपंच आरक्षित ग्रामपंचायती:
  • रामपुर
  • धानोरा
  • चार्ली
  • चिंचोली बुज
  • कढोली बुज
  • मारडा

सर्वसाधारण सरपंच आरक्षित ग्रामपंचायती:
  • आर्वी
  • मूर्ती
  • सुमठाना
  • साखरवाही
  • पेल्लोरा
  • मुठरा
  • सिंधी

        ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे स्थानिक राजकीय गट, युवक, महिला आणि नवउद्यमशील नेतृत्व मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे. आरक्षणामुळे काहींना संधी मिळाल्याचा आनंद तर काहींच्या आकांक्षांवर पाणी फिरल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top