Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूरच्या कंत्राटी कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरच्या कंत्राटी कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा भारतीय मजदूर संघाची आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी आमचा विदर्भ - अनंता गो...
चंद्रपूरच्या कंत्राटी कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा
भारतीय मजदूर संघाची आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२५) –
        चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून, येथे विविध खाणकामे, कारखाने व अन्य उद्योगधंदे प्रचंड प्रमाणावर सुरु  आहेत. या उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे जीवन अत्यंत कष्टप्रद असून, प्रदूषण व उष्णतेच्या कडाक्याचा त्यांना रोज सामना करावा लागतो.

        या पार्श्वभूमीवर, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा मंत्री पवन ढवळे यांनी माजी मंत्री व आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे विशेष मागणी केली आहे की, शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी/ग्रामीण) अंतर्गत किंवा तत्सम घरकुल योजनेचा लाभ चंद्रपूर येथील कंत्राटी कामगारांनाही मिळावा. पवन ढवळे यांनी निदर्शनास आणले की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, चंद्रपूरच्या कंत्राटी कामगारांना देखील स्वतःचे हक्काचे घर मिळाले पाहिजे. ते केवळ कामगारच नाहीत, तर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे खरे शिल्पकार आहेत.”

        आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत, विषय शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी दिली. या मागणीमुळे कंत्राटी कामगारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून, वर्षानुवर्षे भाड्याच्या जागांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना आता स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top