Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांचा पूज्य सिंधी सेवा समितीच्या वतीने सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांचा पूज्य सिंधी सेवा समितीच्या वतीने सत्कार आमचा विदर्भ - राजेश अरोरा बल्लारपूर (दि. १२ जुलै ...
बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांचा पूज्य सिंधी सेवा समितीच्या वतीने सत्कार
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. १२ जुलै २०२५) –
        नुकतेच बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल देवेंद्र आर्य यांचा पूज्य सिंधी सेवा समितीच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ बल्लारपूर शहरातील सिंधी समाजाच्या गुरुद्वारा बस्ती विभागात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात उपस्थित सर्व समाजबंधूंनी देवेंद्र आर्य यांना साल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.

        कार्यक्रमाला सिंधी समाजाचे प्रताप सेठ मूलचंदानी, बल्लारपूर बिजनेस असोसिएशनचे प्रणेते भगवानदास गिदवानी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, गोविंद आहूजा, दिलीप मूलचंदानी, चंदू सेठ आसवानी, मोहन सेठ गिदवानी, सूरज लालवानी, पूनम मंगानी, राम मंगानी यांच्यासह अनेक सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना समाजबांधवांनी देवेंद्र आर्य यांच्या निवडीचे स्वागत करत, त्यांच्याकडून बल्लारपूर शहरात सर्वसमावेशक विकास व सामाजिक सलोख्याचे वातावरण प्रस्थापित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top