प्रेमांजली संस्थेचा हिरवा उपक्रम – वृक्षारोपणात मुलांचा सहभाग
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १० जुलै २०२५) -
स्थानिक प्रेमांजली महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चुनाळा येथील गोशाळा परिसरात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा धंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपणानंतर गोशाळेचे व्यवस्थापक भैसने मामाजी यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे पर्यावरणीय महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, “आपल्या जीवनात झाडांचे स्थान अनन्यसाधारण असून, निसर्गाच्या संतुलनासाठी झाडांचे जतन आवश्यक आहे.”
चित्रलेखा धंदरे यांनी यावेळी सांगितले, “फक्त बोलून न घेता संवेदनशील कृतीतून वृक्षारोपणासारखे उपक्रम करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.” वृक्षारोपण उपक्रमात प्रेमांजली संस्थेच्या सदस्यांनी मुलांच्या सहभागातून झाडे लावली. वृक्षारोपणानंतर मुलांना खाऊ व माहितीपूर्ण पुस्तके वाटण्यात आली. निसर्गाच्या सान्निध्यात व मुलांच्या सहवासात हा उपक्रम आनंददायक ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संस्थेच्या अध्यक्ष चित्रलेखा धंदरे, सचिव साधना येरमे, सदस्या चंदा ओजा, सुनिता कुभांरे, रजनी बोढे, लक्ष्मी बोबाटे, विणा देशकर, मंगला हरडे, यमुना वानखेडे, गोशाळा व्यवस्थापक भैसने मामाजी व गोशाळा परिसरातील आश्रमातील विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.