Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रात्रीच्या चोरींमुळे रामपूरकर हैराण; सरपंचांच्या नेतृत्वात पोलिसांना निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रात्रीच्या चोरींमुळे रामपूरकर हैराण; सरपंचांच्या नेतृत्वात पोलिसांना निवेदन गावात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामपंचायतीची पोलिसांकडे धाव आमच...
रात्रीच्या चोरींमुळे रामपूरकर हैराण; सरपंचांच्या नेतृत्वात पोलिसांना निवेदन
गावात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामपंचायतीची पोलिसांकडे धाव
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १० जुलै २०२५) -
        राजुरा शहरालगत असलेल्या मौजा रामपूर येथील नागरिक गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या वाढत्या घटनांमुळे हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस चोरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असल्याने गावकरी भयभीत आहेत. नागरिक रात्री घर कुलूप लावून बाहेरगावी किंवा कोणत्याही कार्यक्रमाकरिता जाण्यास घाबरत आहेत, परिणामी सामाजिक व वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रामपूर ग्रामपंचायतीकडून पोलीस प्रशासनाकडे रात्रीच्या गस्तीसाठी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत निवेदन देण्यात आले. या निवेदन देताना रामपूरच्या सरपंच निकिताताई रमेश झाडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर, ग्रामपंचायत सदस्य अतुल खनके उपस्थित होते. ग्रामस्थांची ही मागणी योग्य असून पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देत मौजा रामपूरमध्ये नियमित रात्रीची गस्त सुरू करावी, अशी आग्रही भूमिका ग्रामपंचायतीने मांडली आहे. रामपूरमधील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top