Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: IMA चंद्रपूरचा MMC विरोधात तीव्र निषेध – CCMP मान्यता रद्द करण्याची मागणी; ११ जुलैला आरोग्य सेवा बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
IMA चंद्रपूरचा MMC विरोधात तीव्र निषेध – CCMP मान्यता रद्द करण्याची मागणी; ११ जुलैला आरोग्य सेवा बंद आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि....
IMA चंद्रपूरचा MMC विरोधात तीव्र निषेध – CCMP मान्यता रद्द करण्याची मागणी; ११ जुलैला आरोग्य सेवा बंद
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. १० जुलै २०२५) -
        महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) ने ३० जून २०२५ रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे केवळ एक वर्षाचा ‘Certificate Course in Modern Pharmacology (CCMP)’ पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणीची मुभा दिली आहे. या निर्णयाचा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखेने तीव्र निषेध केला आहे.

        IMA च्या मते, हा निर्णय वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जा, नैतिकता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेच्या पूर्ण विरोधात असून, रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे याविरोधात ११ जुलै २०२५ रोजी गुरुवारी सकाळी ८ पासून एकदिवसीय हॉस्पिटल व आरोग्य सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

        या आंदोलनात चंद्रपूर IMA अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित, IMA महाराष्ट्र माजी उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, IMA चंद्रपूर सचिव डॉ. सुश्रुत भुकते, डॉ. दीपक निलावार, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. अनुप पालीवाल, डॉ. भूपेश भलमे, डॉ. नगीना नायडू, डॉ. सुधीर रेगुंडवार, डॉ. स्नेहल पोटदुखे, डॉ. हर्ष मामीडवार, डॉ. अभय राठोड, डॉ. राहुल सैनानी, डॉ. अप्रतिम दीक्षित या सर्व सदस्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

IMA च्या आंदोलनाच्या मागणीचा मुख्य गाभा -
  • CCMP अभ्यासक्रम केवळ एक वर्षाचा असून त्याद्वारे आधुनिक वैद्यकशास्त्राची सखोल माहिती मिळणे अशक्य आहे.
  • या निर्णयामुळे वैद्यकीय पेशातील व्यावसायिकतेवर गालबोट लागेल.
  • रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल.
  • शासनाने ही अधिसूचना तात्काळ मागे घ्यावी.

IMA चंद्रपूरचा निर्धार
        "जर शासनाने ही अधिसूचना मागे घेतली नाही, तर IMA संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल," असे ठाम वक्तव्य IMA चंद्रपूर शाखेने केले आहे. सदर आरोग्य सेवा बंदमध्ये सर्व रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल डॉक्टरांनी दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांची सहानुभूती मिळावी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top