Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बल्लारपूर काँग्रेस अध्यक्षपदावर नव्या दमाची एंट्री
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर काँग्रेस अध्यक्षपदावर नव्या दमाची एंट्री देवेंद्र आर्य यांची नियुक्ती – काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंद आमचा विदर्भ - राजेश अरोरा  बल...
बल्लारपूर काँग्रेस अध्यक्षपदावर नव्या दमाची एंट्री
देवेंद्र आर्य यांची नियुक्ती – काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंद
आमचा विदर्भ - राजेश अरोरा 
बल्लारपूर (दि. ०१ जुलै २०२५) -
        महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी माजी गटनेते देवेंद्र सत्यदेव आर्य यांची बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

        यापूर्वी हे पद अब्दुल करीम यांच्याकडे होते. देवेंद्र आर्य यांच्या नियुक्तीचे काँग्रेस कार्यकर्त्यांतून स्वागत होत असून, त्यांनी आपल्या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडवले, रजनीताई हजारे व माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांचे आभार मानले.

        देवेंद्र आर्य यांच्या निवडीवर माजी शहर अध्यक्ष अब्दुल करीम, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी नगराध्यक्षा छायाताई मडावी, तालुका महिला अध्यक्ष अफसाना सय्यद, शहर महिला अध्यक्षा मेघा भाले, जिल्हा परिवहन अध्यक्ष नरेश मुंदडा, युवक काँग्रेस शहराध्यक्ष नरेश आनंद भास्कर माकोडे, डॉ. सुनील कुलदीवार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक डॉ. अनिल वाढई, चेतन गेडाम, जयकिरण बाजगोटी, इस्माईल ढाक वाला, प्रणेश अमराज, चंदा बुंदेल, मीना बहु, रिया रवी, मातंगी कासिमभाई, शरद अलोणे, सुरेश बोपणवार आदींनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top