Agriculture Day पर्यावरण समतोलासाठी बांबू लागवड गरजेची – सय्यद आबिद अली
वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करत कृषी दिन साजरा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
कोरपना (दि. ०१ जुलै २०२५) –
महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समिती यांच्या वतीने समितीच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विजय पेंदाम हे होते. आपल्या भाषणात त्यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधारित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. त्यांनी शेतीत प्रयोगशीलता व अर्थकारणाचा विचार करून ‘बांबू लागवडीसारख्या’ पर्यायांचा अंगीकार करण्याचे आवाहन करत तालुक्यात बांबू लागवडीची चळवळ उभारण्याचा संकल्प या दिवशी करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकत, बदलत्या काळात शाश्वत शेती आणि नव्या तंत्रज्ञानाची गरज अधोरेखित केली.
सामाजिक कार्यकर्ते सय्यद आबिद अली यांनी 1970–72 मधील भीषण दुष्काळाचे वास्तव सांगत, त्या काळात वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडवून आणल्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी वाढत्या तापमान, प्रदूषण, आणि जंगल क्षेत्राच्या ऱ्हासामुळे पर्यावरणाच्या समतोलावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. कार्यक्रमात सहाय्यक गटविकास अधिकारी होळकर, कृषी अधिकारी दूधे, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, महिला संघाच्या कार्यकर्त्या, सदन शेतकरी, ग्राम रोजगार सेवक तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विस्तार अधिकारी गाडगे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.